शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कवडीमोल भाव; शेतकऱ्याने टनभर वांगी घातली जनावरांना!, झाडे उपटून लावली काडी

By संजय पाटील | Updated: April 13, 2023 13:13 IST

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

संजय पाटीलकऱ्हाड : शेतमालाला शाश्वत भाव नसल्याने अगोदरच शेतकरी हताश झालेत. त्यातच दराच्या चढ-उताराच्या फेऱ्यात आता वांगी उत्पादक शेतकरी सापडलेत. अचानक दर ढासळल्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्याने टनभर वांगी तोडून जनावरांना घातली; तर झाडे कापून त्यांना चक्क काडी लावली. कऱ्हाड तालुक्यातील अभयचीवाडीत शेतकऱ्याचा हा मन सुन्न करणारा हताशपणा पाहायला मिळाला.

अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने दहा गुंठे क्षेत्रात वांग्याचे पीक घेतले. वांगी हे बारमाही उत्पन्न देणारे पीक. त्यामुळे उत्पादनखर्च वजा जाता चांगला नफा मिळेल, अशी येडगे यांना अपेक्षा होती. जानेवारी महिन्यात त्यांनी वांग्याच्या रोपांची लागवड केली. त्यावेळी वांग्याला प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये दर होता. तो दर टिकून राहिला तर चांगला नफा मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे रघुनाथ येडगे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय जोमाने कामाला लागले.

गत पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी वांग्याचा पहिला तोडा केला. त्यावेळी दर प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांवर होता आणि आता अचानक दर चार रुपयांपर्यंत खाली आला. या दरातून वाहतूक खर्चही निघणे शक्य नसल्यामुळे हताश झालेल्या रघुनाथ येडगे यांनी शेतातील सुमारे टनभर वांगी काढून जनावरांसमोर टाकली; तर झाडे कापून बांधावर टाकत त्यांना काडी लावली.

घेतलेले कष्ट

  • रोपे विकत आणून त्याची लागवड
  • पाणी व्यवस्थापनासाठी केले ठिबक
  • रोपांची लागवड करताच खतांची मात्रा
  • तीन वेळा केली औषध फवारणी
  • दोन वेळा मजुरांकरवी केली भांगलण
  • वांगी तोडणीसह बाजारपेठेत वाहतूक

उत्पन्नापेक्षा खर्च जास्तरघुनाथ येडगे यांनी गत पंधरा दिवसांत सुमारे टनभर वांग्यांची विक्री केली. त्यांना २५ ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यातून त्यांना सुमारे तीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, त्यांनी रोपे विकत घेण्यापासून उत्पादन निघेपर्यंत केलेला खर्च तीस हजारांपेक्षा जास्त आहे.

दर मिळेल, या अपेक्षेने आम्ही वांगी आणि मिरचीची लागवड केली होती. सुरुवातीला थोडेफार पैसे मिळाले. मात्र, अचानक दर कमी आला. आता उत्पादन घेण्यात काहीच अर्थ नाही. वाहतूक खर्चही निघणार नाही. त्यामुळे मी वांग्याची झाडेच कापून काढली आहेत. - रघुनाथ येडगे शेतकरी, अभयचीवाडी, ता. कऱ्हाड 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी