शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आधी लगीन शिक्षक बँकेचे; मग सोसायटीचं!, शिक्षक प्रचारात दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:54 IST

जिल्हा बँकेची निवडणूक होत असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचीही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

प्रमोद सुकरेकराड: सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत आहे. त्याच्या प्रचाराचा धुरळा सुरू असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर आहे. त्यामुळे आधी लगीन बँकेचे मग सोसायटीचं त्यामुळे सोसायटीचे फक्त अर्ज भरून ठेवा उमेदवार निश्चितीचं नंतर बघू; अशीच भूमिका शिक्षक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसत आहे.खरंतर प्राथमिक शिक्षक हा शासकीय कर्मचारी असल्याने त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचे संकेत आहेत. पण आता दस्तूर खुद्द त्यांच्याच अर्थवाहिनींच्या निवडणुका लागल्याने हे शिक्षक निवडणुकीच्या प्रचारात चांगलेच दंग झालेले आहेत. मात्र एका बाजूला जिल्हा बँकेची निवडणूक होत असतानाच कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचीही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिक्षक बँकेला संधी न मिळालेले अनेक जण शिक्षक सोसायटीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र यातील कोणालाच दुखवायचे नाही ही भूमिका घेत शिक्षक नेत्यांनी अगोदर जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक होऊन जाऊदेत. त्यानंतर सोसायटी निवडणूक येते. त्याचे अर्ज दाखल फक्त करून ठेवा अर्ज माघारीला बरीच मुदत आहे. ते नंतर बघू अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे काही इच्छुक आनंदी दिसत असले तरी काही जण गॅसवर असल्याची चर्चा आहे.सातारा जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघातील फूट कायम राहिलेली दिसते. शिक्षक नेते माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल रिंगणात उतरवले आहे. तर शिक्षक संघाचे दुसरे नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षक समितीला मदतीचा हात देत दुसरे पॅनेल उभे केले आहे.त्यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता १९ नोव्हेंबरला त्यासाठी मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आरोप -प्रत्यारोपेच्या फैरी दररोज झडताना दिसत आहेत. आता गुलाल नक्की कोणाचा हे निकालानंतर स्पष्ट होईल.

कराड -पाटण तालुका शिक्षक सोसायटी निवडणुकीसाठी आत्तापर्यंत ३५० वर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. तर सोमवार अखेर १४० वर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल होतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा बँकेच्या निकालाचा होणार परिणाम

सातारा जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत असून त्याचा निकाल लगेच  लागणार आहे .त्या निकालाचा परिणाम कराड शिक्षक सोसायटी निवडणूकीवर निश्चित होणार आहे. त्यामुळे जो तो आपापल्या परीने जिल्हा शिक्षक बँकेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक