शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर'

By प्रमोद सुकरे | Updated: January 21, 2025 12:03 IST

'भाजप'च्या गोटात अस्वस्थता!

प्रमोद सुकरेकराड : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तरीही मुख्यमंत्री कोणाचा? यावरुन सरकार स्थापनेला अन त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला बराच वेळ गेला.पण त्यात सातारा जिल्ह्याला इतिहासात प्रथमच एकाचवेळी चार कँबिनेट मंत्रीपदे मिळाली.त्यामुळे जिल्हा सुखावला असला तरी सातारच्या पालकमंत्री पदाचं चौघांचाही जीव अडकला होता. पालकमंत्रीपदाचं घोडं महिनाभर अडलं होतं. पण पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य' पुन्हा एकदा 'शंभुराजा'च्या हातात दिले गेल्याने शिवसैनिकांच्यात मोठा आनंद दिसत आहे.सातारा जिल्हा हा आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत ८ ही मतदारसंघात महायुतीने बाजी मारली. त्यात सर्वाधिक ४ आमदार भाजपचे, २ शिवसेनेचे तर २ राष्ट्रवादी कचे विजय झाले. तर मंत्रिमंडळात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवसेनेचे शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांची वर्णी लागली. कॅबिनेट मंत्री झालेले हे चारही आमदार मातब्बर असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर या चौघांचाही डोळा होता. या माध्यमातून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळावी असे प्रत्येकाला वाटत होते.मात्र थेट त्यावर कोणीच बोलत नव्हते.

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सातारचे पालकमंत्रीपद द्यावे अशी जाहीर मागणी केल्याने इतरांची गोची झाली होती. याबाबत इतर मंत्र्यांना विचारले असता हा निर्णय वरिष्ठ घेतील एवढेच सांगत सावध भूमिका ते मांडत होते. पण जिल्ह्यात भाजपची ४ आमदार असल्याने, त्यातील २ दोन मंत्री असल्याने पालकमंत्री भाजपचा होईल. त्यातल्या त्यात खासदार 'उदयनराजें'नी मागणी केल्यामुळे ही संधी सातारच्या शिवेंद्रराजेंनाच मिळेल अशी चर्चा जोर धरू लागली होती.

मात्र शनिवारी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली. त्यात सातारच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शंभुराज देसाईंवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच शिवसैनिकांच्यात आनंदी वातावरण दिसत आहे. सातारसाठी सर्वात जास्त 'आतुर' असणाऱ्या शिवेंद्रराजेंना 'लातूर' तर जयाभाऊंना सातारा नसले तरी त्यांच्या लोकसभा मतदार संघाशी निगडित 'सोलापूर' जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे.

अनुभवाचा व ज्येष्ठत्वाचा फायदा झाला सातारा जिल्ह्यामध्ये ४ कॅबिनेट मंत्री झाली असली तरी शंभूराज देसाई वगळता इतर तिघेही प्रथमच मंत्री झाले आहेत. मंत्री देसाईंना मंत्रीपदाचा व सातारच्या पालकमंत्री पदाचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यातच ते ज्येष्ठ मंत्री असल्याचा फायदा त्यांना पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी झाला असल्याचे बोलले जातेय.

'भाजप'च्या गोटात अस्वस्थता!शिवसेनेचे नेते 'शंभूराज' देसाईंना सातारचे पालकमंत्री केल्यानंतर  जिल्ह्यातील भाजपच्या गोटात मात्र काहीशी अस्वस्थता दिसत आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असताना, भाजपचे ४ आमदार अन दोन कँबिनेट मंत्री असताना त्यापैकी एकाला पालकमंत्री पद मिळायला हवे होते.अशी भावना भाजपचे अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करताना दिसत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरguardian ministerपालक मंत्रीShiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाईBJPभाजपाShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले