शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरडी झालेली कोयना आनंदाश्रूंनी भरून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:31 IST

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते.

दीपक शिंदे -

सातारा : महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले शिंदे लहानपणापासून गावाकडेच होते. त्यामुळे त्यांची गावाशी आणि गावकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने नाळ जुळलेली आहे. सध्या कोयना नदी कोरडी आहे, पण गावकऱ्यांना एवढा आनंद झाला आहे की ही नदी आनंदाश्रूंनी भरून जाईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते. या भागातील सर्वच लोकांची अशीच परिस्थिती आहे. कोयना धरणामुळे गावे विस्थापित झाली होती. जमीन पाण्याखाली गेल्याने उपजीविकेची फारशी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष मुंबईला जाऊन नोकरी करत असे आणि आपल्या पगारातील पैसे मुंबईहून गावाला पाठवायचे त्यावर कुटुंबाची गुजराण करायची. एकनाथ शिंदे यांचे वडील मुंबईत होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणण्यात आले. या ठिकाणी त्यांनी आपले पुढील अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कुटुंबाला हातभार म्हणून वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालविण्याचे काम करत होते. एकनाथ शिंदेंना दोन भाऊ प्रकाश आणि सुभाष तर सुनीता नावाची एक बहीण आहे.  ठाणे परिसरात सातारा कॅम्प म्हणून रिक्षाचालकांची मोठी संघटना आहे. हे लोक एकमेकांच्या मदतीने रिक्षाचा व्यवसाय करतात. रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळे गावाकडून मुंबईत ठाणे, गोरेगाव या भागात गेलेले अनेक लोक रिक्षा चालवितात आणि ते सर्व शिवसेनेशी बांधिलकी ठेवून असतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय करताना एकनाथ शिंदे यांची भेट आनंद दिघे यांच्याशी झाली आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ठाणे पालिकेचे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. त्यांच्या या निवडीनंतर गावातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 

गावकऱ्यांनी केला होता मुख्यमंत्रिपदासाठी नवसदरे तर्फे तांब या गावातील लोकांनी युतीचे सरकार आले त्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाला नवस केला होता. एकनाथ शिंदे यांचीही या देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी देवाच्या मंदिरात येऊन आनंदोत्सव साजरा केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर