शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अष्टप्रधान मंडळाच्या आठ स्तंभावर उभा राहणार सातारा पालिकेचा डोलारा, इमारतीत 'याचा' असणार अंतर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:49 IST

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील आठ स्तंभ तयार करण्यात येणार असून या अष्टप्रधान मंडळाच्या आठ मजबूत खांबावर पालिकेची भव्य इमारत उभी राहणार आहे.

सातारा : सातारा पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाला प्रारंभ झाला असून, सदर बझार येथे तब्बल ४ हजार १०९ स्क्वेअर मीटर क्षेत्रात भव्य-दिव्य अशी नऊ मजली इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी १० मीटर खोदकाम केले जाणार असून, तीन वर्षांत ही इमारत मार्गी लावण्याचे विकासकाचे नियोजन आहे. यासाठी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील आठ स्तंभ तयार करण्यात येणार असून या अष्टप्रधान मंडळाच्या आठ मजबूत खांबावर पालिकेची भव्य इमारत उभी राहणार आहे.नव्या प्रशासकीय इमारतीसाठी सदर बझार येथील एक एकर जमीन विनामोबदला पालिकेला देण्यात आली आहे. पुण्याच्या ‘विकास स्टुडिओ’ या कंपनीने इमारतीचा रेखांकन आराखडा तयार केला असून, या आराखड्यानुसार पालिकेची भव्य-दिव्य अशी नऊ मजली इमारत उभी राहणार आहे. या कामकाजाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून सध्या खोदकाम सुरू करण्यात आले आहे. ४ हजार १०९ स्केअर मीटर क्षेत्रात आतापर्यंत साडेसात मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, अजून अडीच मीटर खोदकाम केले जाणार आहे. यानंतर आरसीसी स्ट्रक्चर, फर्निचिंग आयटम, अप्पर व लोअर ग्राऊंड फ्लोअर अशी कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहे.या इमारतीला एकूण नऊ मजले असून, त्यातील सहा मजल्यांवर प्रशासकीय कामकाज चालणार असून, खालच्या दोन मजल्यांवर वाहनतळ असणार आहे. नागरिकांच्या सतत संपर्कात येणारी कार्यालये ही पहिल्या तीन मजल्यांवर असणार आहेत. तर वरच्या मजल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती यांची दालने, कमिटी हॉल तसेच इतर कार्यालयांचे कामकाज चालणार आहे. २०२५पर्यंत ही इमारत मार्गी लावून पालिकेकडे हस्तांतरित करण्याचे विकासकाचे नियोजन आहे.

इमारतीत याचा असणार अंतर्भावइमारतीच्या दर्शनी भागावर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे आठ स्तंभ, दर्शनी भागात शिवरायांचा पुतळा, वाहनतळ, सुसज्ज सभागृह, आर्ट गॅलरी, नगराध्यक्ष, सभापतींसाठी स्वतंत्र दालन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विजेसाठी सोलर पॅनेल, लिफ्ट, कॅन्टीन, प्रदर्शन हॉल, कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस सेंटर यांचा समावेश आहे.

  • इमारतीचे एकूण क्षेत्र : ४१०९ स्क्वेअर मीटर
  • एकूण बांधकाम : १.५० लाख स्क्वेअर मीटर
  • एकूण मजले : ९
  • वाहनतळ : २ मजली
  • पूर्णत्वाचा कालावधी : २०२५
टॅग्स :Satara areaसातारा परिसर