शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

कोयना धरणातून सायंकाळी विसर्ग सुरू होणार, पाण्याची आवक वाढली 

By नितीन काळेल | Updated: July 24, 2023 13:25 IST

पावसामुळे दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे दाणादाण सुरू असून सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला सर्वाधिक २०१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयना धरणात पाण्याची मोठी आवक असल्याने ५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे अर्धे धरण भरले आहे. त्यातच साठा वाढल्याने पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रीय होऊन एक महिना झाला आहे. आतापर्यंत पश्चिम भागातच पावसाचा जोर दिसून आला. तर पूर्व भागाकडे प्रतीक्षा कायम आहे. आतापर्यंतच्या एक महिन्यात पश्चिमेकडील कोयना, नवजा, कास, बाणमोली, तापोळा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यापासून तर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे नवजासह महाबळेश्वरचा पावसाने तीन हजार मिलीमीटरकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे रस्त्यावर दरडी, झाडे कोसळू लागली आहेत. यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. तसेच पावसामुळे दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १५० मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २०१ आणि महाबळेश्वरला १८५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस हा नवजा येथे २,८७२ आणि महाबळेश्वरला २,७८२ मिलीमीटर पडला आहे. तर कोयनानगर येथे आतापर्यंत फक्त २,०६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणाणतील पाणीसाठ्यानेही रविवारी रात्री ५० टीएमसीचा टप्पा पार केला. तर सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५२ टीएमसी साठा झाला होता. या कोयना धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यामुळे धरण ५० टक्के भरलेले आहे. सध्या धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ६० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातून १,०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास विसर्ग सुरू होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस