शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात, साताऱ्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू 

By दीपक देशमुख | Updated: January 10, 2024 12:11 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी ...

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. मुंबई येथील बैठकीत साताऱ्यातून खा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, सुनील माने, पाटणकर यांनी उमेदवारी मागितली तर माढ्यासाठी अभयकुमार जगताप इच्छुक आहेत. याशिवाय ऐनवेळी कोण उमेदवारीचा पत्ता बाहेर काढणार याचीही उत्सुकता आहे.मुंबई येथे नुकतीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, प्रभाकर देशमुख, कविता म्हेत्रे, मकरंद बोडके, डॉ. नितीन सावंत, डॉ. सतीश बाबर, ॲड. नीलेश डेरे, राजाभाऊ काळे, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, सचिन जाधव, प्रशांत पवार उपस्थित होते.खा. पवार यांनी दाेन्ही मतदारसंघातील पक्षाचा आढावा घेतल्यानंतर इच्छुकांची मते जाणून घेतली. यावेळी लोकसभेसाठी सुनील माने यांनी उमेदवारीची मागणी केली. ॲड. नीलेश डेरे यांनी लोकसभेसाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीची, तर प्रशांत पवार, सचिन जाधव, सूरज कीर्तिकर यांनी सारंग पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली. माढा मतदारसंघातून प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी, तर माळशिरस मगरे या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली. लोकसभेसाठी इच्छुक वाढू लागले असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर एवढ्या लवकर खा. शरद पवार यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी उमेदवार जाहीर करणार का? ऐनवेळी पत्ता जाहीर करणार याची उत्सुकता लागली आहे.

उमेदवार निवडताना लागणार कसोटीसातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीला श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी समोर दिसत नाही. माढा मतदारसंघाचा विचार करता जिल्ह्यातील माण-खटावमध्ये भाजपचे, तर फलटण मतदारसंघ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. माढा विधानसभेत राष्ट्रवादी, सांगोला शिवसेना, माळशिरसला भाजप, तर करमाळ्यात अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार देताना कसोटी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेस