शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
5
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
6
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
7
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
8
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
9
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
10
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
12
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
13
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
14
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
15
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
16
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
17
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
18
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
19
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
20
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:16 IST

प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध

कराड : कराड नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. मात्र, तांत्रिक मुद्द्यावर २ डिसेंबर रोजी या जागेसाठीचे मतदान रद्द करण्यात येऊन ते २१ डिसेंबर रोजी निश्चित केले आहे. मात्र, तोवर पुन्हा संबंधित उमेदवार अखिल आंबेकरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्याबाबत मंगळवारी सुनावणी होती. मात्र, ती झालीच नाही. त्यामुळे बुधवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल नेमका काय लागणार? त्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याबाबत धाकधूक वाढली आहे.याबाबत माहिती अशी की, कराड येथील प्रभाग १५ मधून अकिल आंबेकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरवला. त्यानंतर आंबेकरी यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. तेथेही त्यांचा अर्ज अवैधच ठरला. मात्र, न्यायालयाचा लागलेला निकाल व दरम्यान झालेले चिन्ह वाटप याबाबत काही तांत्रिक मुद्द्यावरती ही १५ ब ची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली. ती आता २१ डिसेंबरला होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे.दरम्यान, अकिल आंबेकरी यांनी ५ डिसेंबर रोजी मुंबई येथे उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने संबंधितांना नोटीस पाठविल्या होत्या. मंगळवार दि. ९ रोजी मुंबईत त्याची सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी झाली नाही. त्यामुळे बुधवार, दि. १० रोजी सुनावणीची होण्याची शक्यता आहे.सुनावणीत काय निर्णय?दरम्यान, बुधवार, दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने मुंबईतील सुनावणीत नेमका काय निर्णय होणार? याकडे कराडकरांच्या नजरा आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे.

मी कराड पालिका निवडणुकीत १५ ‘ब’मधून अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अवैध ठरवत माझ्यावर अन्याय केला. म्हणून मी जिल्हा न्यायालयात दाद मागितली, पण न्याय मिळाला नाही. आता मी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, याबाबत मंगळवारी सुनावली होती. मात्र, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने ती होऊ शकली नाही. त्यामुळे बुधवार, दि. १० रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. - अकिल आंबेकरी, (अपीलकर्ते)

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Karad Ward 15B Election Uncertainty Continues; Court Hearing Delayed

Web Summary : The Karad municipal election for ward 15B faces uncertainty as a candidate's appeal regarding his rejected nomination is delayed in High Court. A hearing is now expected Wednesday, leaving the election commission's next steps unclear after an earlier postponement.