शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: झाड जाळण्याची वृत्ती चक्क प्रशासनाच्या दारी!, सजगपणा दाखविल्यामुळे बचावले झाड

By प्रगती पाटील | Updated: March 25, 2024 20:32 IST

Satara News: मनुष्याला प्राणवायु देण्याबरोबरच तळपत्या उन्हात सावली देण्याचं काम करणाऱ्या झाडांच्या जीवावरच काही अपप्रवृत्ती उठली आहे. इतके दिवस दुकानांच्या समोर अडथळा ठरणाऱ्या झाडांचा जीव घेणाऱ्या प्रवृत्तीचे धाडस आता वाढले आहे.

- प्रगती जाधव-पाटील सातारा - मनुष्याला प्राणवायु देण्याबरोबरच तळपत्या उन्हात सावली देण्याचं काम करणाऱ्या झाडांच्या जीवावरच काही अपप्रवृत्ती उठली आहे. इतके दिवस दुकानांच्या समोर अडथळा ठरणाऱ्या झाडांचा जीव घेणाऱ्या प्रवृत्तीचे धाडस आता वाढले आहे. या प्रवृत्तीने चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाडचं जाळण्याचा प्रयत्न केलाय. प्रसंगावधान राखत पालिकेशी संपर्क साधून पाणी मारून झाडा भोवती लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. पण झाड जाळण्याची वृत्ती चक्क प्रशासनाच्या दारी पोहोचल्याचा संतापही व्यक्त केला जात आहे.

उन्हाळ्याची सुरूवात झाली की जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण जसे वाढतेय तसेच झाडांना ठार मारण्याचेही प्रकार वाढीस लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राजपथावर एका बड्या व्यावसायिकाने दुकानासमोरील झाड तोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला विरोध करत हरित सातारा या पर्यावरण ग्रुपने निदर्शने केल्यानंतर हे झाड वाचविण्यात यश आले. तर झाडाची साल काढून झाड झाळल्याचा ठपका ठेवुन पालिकेने एका व्यावसायिकाला कारणे दाखवा नोटीसही धाडली. त्यानंतर महाविद्यालयासमोर असलेल्या झाडावर चक्क अॅसिड प्रयोग करण्यात आला. ते झाड पर्यावरणप्रेमींनी वाचवून त्याची काळजी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपासून हे झाड मारण्याचे प्रकार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीही पालिकेने बुंध्याला लागलेली आग विजवली होती. त्यानंतर पुन्हा अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना समोरचे झाडच जाळण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

१. झाड जाळायला चक्क पाला पाचोळाअप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर गेल्या अनेक दशकांपासून सावलीचे साम्राज्य उभे करणारी वडाची झाडे आहेत. मोठा बुंदा आणि डेरेदार असलेल्या या झाडाचा विस्तार पन्नास फुटांपेक्षा अधिकचा आहे. स्वच्छता कर्मचारी रोज या झाडांची गळलेली पाने त्याच्या बुंद्याखाली गोळा करून ठेवतात. गोळा केलेल्या या पाचोळ्यालाच कोणा अज्ञाताो आग लावुन झाड जाळण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळावर आढळून आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर