शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा दणका; सातारा जिल्ह्यात १५ दुकाने निलंबित, तीनचा परवाना रद्द 

By नितीन काळेल | Updated: June 19, 2024 17:46 IST

खरीप हंगाम : १२ भरारी पथकाचा वाॅच; तपासणीत दोषी आढळल्यास थेट कारवाई 

सातारा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असून खते, बियाणे, किटकनाशकांबात फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागही सतर्क आहे. यासाठी कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच ठेवण्यासाठी १२ भरारी पथके कार्यरत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत तपासणीत दोषी आढळलेल्या १५ दुकानांचा परवाना निलंबीत तर तीनचा कायमस्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यंदा खरीपाचे सर्वसाधारणपणे २ लाख ९० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ७५ हजार हेक्टर राहणार असून यानंतर बाजरीचे ६० हजार, भात ४४ हजार, खरीप ज्वारीचे ११ हजार, भुईमूग २९ हजार आणि मकेचे १५ हजार हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. तर इतर पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे.या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. कारण, शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके लागतात. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने लक्ष ठेवण्यात येते. आताही कृषी विभागाने दुकानांची तपासणी करुन कारवाईस सुरूवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यासही दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यात भरारी पथकाने कारवाई केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ कृषी निविष्ठा दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर तीनचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. रद्द झालेले तीनही दुकाने ही पाटण तालुक्यातील आहेत. तर निलंबितमधील १४ दुकाने ही पाटण तर एक कऱ्हाड तालुक्यातील आहे.

या कारणासाठी दुकानांचे निलंबन अन् परवाना रद्द..दुकानचालकांनी रेकाॅर्ड अद्ययावत न ठेवणे, पाॅश मशिन आणि स्टाॅक रजिस्टरमध्ये तफावत आढळणे, कृषी विभागाच्या नोटीसीस उत्तर न देणे, सुनावणीवेळी कागदपत्रे योग्य पद्धतीने सादर न करणे आदी कारणांमुळे कृषी निविष्ठा दुकानांवर कारवाई झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे मुबलक आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी १२ भरारी पथकांचा कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच असणार आहे. पथके अचानक भेट देऊन तपासणी करत आहेत. तर आतापर्यंत १५ कृषी निविष्ठा दुकानांचे निलंबन तर तीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र