शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडकर मठाच्या मठाधिपतीला सक्तमजुरी, विश्वस्तांवर केला होता जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:20 IST

मठाचे अध्यक्ष तथा विश्वस्त यशवंत माने यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजीराव कऱ्हाडकर याला अटक करण्यात आली होती.

कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाच्या विश्वस्तांच्या डोक्यात वीणा घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचा तत्कालीन मठाधिपती बाजीराव भागवत जगताप (वय ३७, मूळ रा. कोडोली, ता. कऱ्हाड) याला न्यायालयाने दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कऱ्हाडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रविकांत साखरे यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली.कऱ्हाड शहरातील मारुतीबुवा मठाचे विश्वस्त व अध्यक्ष यशवंत दाजी माने हे २३ एप्रिल २०१९ रोजी मठामध्ये असताना बाजीराव कऱ्हाडकर हा आरडाओरडा करीत त्या ठिकाणी आला. तेथे असलेली लाकडी वीणा उचलून घेतली. तसेच दिंडी कशी काढता ते बघतो, असे म्हणत तेथील लोकांशी वाद घातला. त्यावेळी मठाचे अध्यक्ष यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याने वीणा त्यांच्या डोक्यात घातली. त्यामध्ये यशवंत माने हे गंभीर जखमी झाले.या खटल्यात सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी बाजीरावमामा कऱ्हाडकर याला या गुन्ह्यात दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.जामिनावर असताना खून !मठाचे अध्यक्ष तथा विश्वस्त यशवंत माने यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजीराव कऱ्हाडकर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला असताना त्याने मठाधिपती जयवंत पिसाळ यांचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्या गुन्ह्यात तो सध्या बंदी कैदी म्हणून कोठडीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालय