शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

तिसऱ्या दिवशीही थैमान

By admin | Updated: March 2, 2016 00:47 IST

महाबळेश्वरात गारांचा पाऊस : फलटण, वाईत दोन जनावरे दगावली; रब्बी पिकांना फटका

सातारा : सातारा जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले. महाबळेश्वर, पाटणसह वाई तालुक्यातील चांदक व गुळूंबमध्ये गारांसह पाऊस झाला. तर फलटणमध्ये अंगावर वीज पडल्याने एक गाय तर वाई येथे एक म्हैस मृत्युमुखी पडली. कऱ्हाड तालुक्यातील काळेवाडी येथे पिकअप शेडची भिंत कोसळली. कुसूर येथे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्याने मजुरांचे संसार उघड्यावर पडले. खंडाळा तालुक्यात गहू, ज्वारी ही पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. वाऱ्यामुळे मेढ्यासह अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. सातारा शहरातही पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. खटाव, म्हसवड या ठिकाणीही पावसाने हजेरी लावली. साताऱ्यात ब्लॅकआऊटसातारा : शहरात मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पश्चिमेकडे अचानक काळे ढग जमा झाले. विजांचा कडकडाट झाला आणि सातारकरांची एकच पळापळ झाली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. शहरात सकाळपासूनच हवेमध्ये उकाडा जाणवत होता. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते. मात्र दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. अचानकपणे सर्वत्र काळोख पसरला. विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. दुपारी चार वाजता पावसाला जोरदार सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच रस्त्यावरील वाहतूकही रोडावली. वाहने रस्त्या कडेला उभी राहू लागली. तसेच वाहनधारक व पादचारी पावसापासून बचावासाठी निवारा शोधण्यासाठी धावताना दिसत होते. पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक, गोडोली, सदरबझारमधील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साठू लागले. जवळपास दीड तास पाऊस कोसळत होता. सुरुवातीला काही वेळ पाऊस जोरदारपणे पडत होता. मात्र, नंतर पावसाचा जोर ओसरला तशी पुन्हा वाहने सुरू झाली. या पावसामुळे शहरात गारवा पसरला. (प्रतिनिधी)पाटणमध्ये आंब्याच्या बागांना फटकापाटण : बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाटण शहर व आसपासच्या गावामध्ये वळीव पावसाचा शिडकावा झाला. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण करून वातावरणात थंडावा केला. मोरगिरी, कोयना, मणदुरे, मल्हारपेठ, मरळी विभागात पावसाने हजेरी लावली.पाटण तालुक्यातील हापूस आंबा बागायतदारांना या पावसाने चिंतेत टाकले. आंबा झाडांना मोहोर आला आहे. त्यामुळे गारांसह पडलेल्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वीटभट्टीधारकांनी आपल्या भट्ट्या प्लॅस्टिक कागद टाकून झाकून ठेवल्या. मोरगिरी भागातही जोरदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना परिसरात मात्र वळीवाच्या किरकोळ सरी कोसळल्या. अचानक पाऊस सुरू झाल्याने कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खंडाळ्यात गहू भुईसपाटखंडाळा : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने खंडाळा तालुक्यात थैमान घातले. मंगळवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली तर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता. मात्र आज दुपारनंतर ढगाळ वातावरण गडत झाले. जोराचा वारा सुटला आणि त्याबरोबरच पावसाच्या धारा कोसळू लागल्या. खंडाळ्यासह अहिरे, मोर्वे, वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, शिवाजीनगर, म्हावशी यासह पूर्व भागात जोराचा पाऊस कोसळला.शेतात असणारी गव्हाची पीके भुईसपाट झाली. तर मका, हरभरा पिकांचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी काढलेल्या हरभऱ्याचे ढिगारे लावण्यात आले होते. पावसाने ते जागीच चिंब झाले. कांदा पिकांची काढणी चालू आहे. त्यामुळे त्याचेही मोठे नुकसान झाले. मोर्वे परिसरात गव्हासह टोमॅटो पिकाचीही पडझड झाली. कुलकळी गळून पडली तर काही ठिकाणी फळेही गळून पडली.अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे संरक्षण करण्यासाठी धांदल उछाली. तर रस्त्याच्या दुतर्फा तसेच रानात पाणी साचून राहिले होते. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खंडाळ्यातील निंबोनी मळा प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचा पत्रा वाऱ्यांमुळे उडाला. (प्रतिनिधी)