शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरावर वीस सीसीटीव्ही लावूनही थांबेना दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:03 IST

सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जगताप कुटुंबीयांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून रात्री-अपरात्री दगडफेक होत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले असून, या कुटुंबाने दगडफेक करणारे शोधण्यासाठी चक्क घरावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र तरीही हे प्रकार सुरूच असून, दगडफेक करणारे शोधणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्देघरावर वीस सीसीटीव्ही लावूनही थांबेना दगडफेककुटुंबाची बोरगाव पोलीस ठाण्यात धाव

दत्ता यादव 

सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जगताप कुटुंबीयांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून रात्री-अपरात्री दगडफेक होत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले असून, या कुटुंबाने दगडफेक करणारे शोधण्यासाठी चक्क घरावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र तरीही हे प्रकार सुरूच असून, दगडफेक करणारे शोधणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे.नागठाणे येथे राजेंद्र दिनकर जगताप (वय ४८) यांचा छोटासा व्यवसाय असून, हे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून या कुटुंबाची अक्षरश: झोप उडाली आहे. एके दिवशी मध्यरात्री अचानक त्यांच्या घरावर दगडफेक झाली. घराबाहेर येऊन त्यांनी कानोसा घेतला असता बाहेर कोणीच दिसले नाही.

खोडसाळपणे कुणीतरी हे कृत्य केले असेल, असे समजून जगताप यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या घटनेच्या दुसऱ्या दिवसांपासून घरावरील दगडफेकीचे प्रमाण वाढले. इतके वाढले की, दिवसाही त्यांच्या घरावर दगडफेक होऊ लागली. हा नेमका काय प्रकार आहे, हे जगताप कुटुंबीयांना समजेनासे झाले. त्यामुळे त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला.

पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर जगताप घरी आले. त्यानंतर मात्र दगडफेकीचे प्रमाण पहिल्यापेक्षा आणखीनच दुपटीने वाढले. रात्री-अपरात्री केव्हाही दगडफेक होत असल्यामुळे जगताप कुटुंबाची पुरती झोप उडाली. आता कुठे पोलिसांनी थोड गांभीर्याने घेतलं होतं. पोलीस तपासासाठी दिवसा घरात आले. त्याचवेळी पुन्हा पोलिसांसमक्ष चक्क दगडफेक झाली. यामुळे पोलिसांना दगडफेकीची खातरजमा झाली.

जगताप यांच्या दारात पडलेला दगड घेऊन पोलीस निघून गेले. आता नक्कीच तपास लागेल, अशा आशेवर कुटुंबीय असतानाच दगडफेक काही थांबता थांबेना. सरतेशेवटी आपल्यालाच काही तरी केले पाहिजे, हे राजेंद्र जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्याजवळ साठवलेली पुंजी खर्च करून सुरुवातीला पाच सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले.

घरावर सुरक्षा कवच असल्यामुळे आता दगडफेक करणारा सापडेल, अशी धारणा होती, त्यामुळे ते काही दिवस निर्धास्त राहिले; परंतु पुन्हा हे प्रकार सुरू झाले. पोलीस ठाण्यात पुन्हा त्यांनी धाव घेतल्यानंतर त्यांना कोणावर तुमचा संशय आहे का, तुमची कोणाची दुश्मनी आहे का, असे पोलिसांकडून प्रश्न विचारण्यात आले. परंतु जगताप यांनी कोणाशीही वाद नसल्याचे सांगितले, त्यामुळे याचे गूढ वाढलेय.पाचचे वीस झाले !जगताप यांनी सुरुवातीला पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही दगडफेक व्हायची ती होतच राहिली. त्यामुळे एकेक कॅमेरा वाढवत त्यांनी असे वीस कॅमेरे घराच्या आजूबाजूने लावले. आता तरी दगडफेक थांबेल, असे वाटत असतानाच दगडफेक सुरूच आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांसमोरही हा प्रकार कथन केलाय. मात्र, तरीसुद्धा दगडफेक सुरूच आहे.तुमचा खेळ संपला !जगताप कुटुंबाच्या घरावर दगडफेक करण्यात येत आहेच, आत्तापर्यंत पाच चिठ्ठ्याही त्यांच्या घराजवळ टाकण्यात आल्या आहेत. तुमचा खेळ संपला.. तुम्हाला जीवे मारणार, असा त्यात उल्लेख आहे. त्यामुळे कुटुंबीय आणखीनच चिंताग्रस्त झाले. टाकीमध्ये पाणी आहे का, हे पाहण्यासाठी गेलेला जगताप यांचा मुलगा राहुल याच्या हातावर दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSatara areaसातारा परिसर