शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

महाबळेश्वर बसस्थानकात बॉम्बच्या अफवेने तणाव, बॉम्ब असल्याचा होता निनावी फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 20:18 IST

पथकांची शोधाशोध. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 

महाबळेश्वर : महाबळेश्वर बसस्थानकातील एका चारचाकी वाहनात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्याने महाबळेश्वरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी व बुधवारी दुपारपर्यंत विविध पथकांकडून बॉम्बचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने महाबळेश्वरवासीयांचा जीव भांड्यात पडला. निनावी फोन करून बॉम्बची माहिती देणाऱ्या विरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वरमधील बसस्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांकासह पोलिसांना केला होता. यानंतर तातडीने महाबळेश्वर पोलिसांनी बसस्थानक, आगार परिसरात तपासणी केली; मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

मंगळवारी रात्रीपासून बसस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता; परंतु माहितीची खातरजमा करण्यासाठी बुधवारी पुन्हा सातारा येथून दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वानपथक अशा विविध पथकांचे अधिकारी बसस्थानक परिसरात दाखल झाले होते. या पथकांनी स्थानकातील प्रत्येक चारचाकी वाहनांसह प्रवाशांच्या सामानाची देखील तपासणी सुरू केली. पथक एवढ्यावरच न थांबता बसस्थानकातील बेवारस वाहनांची देखील तपासणी करण्यात आली. बस आगार, बसस्थानकासमोरील टॅक्सीतळ व परिसरातही तपासणी केली. पथकाने बाजारपेठेत देखील फेरफटका मारून बॉम्ब ठेवलेले वाहन शोधण्याचा प्रयत्न केला. तीन तासांच्या या तपासणीमध्ये बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या शोधमोहीमेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

बॉम्बशोध पथक उशिरा दाखलबसस्थानक परिसरातील वाहनात बॉम्ब असल्याचा निनावी फोन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आला व त्यानंतर तब्बल अठरा ते वीस तासानंतर हे पथक शोधमोहिमेसाठी दाखल झाले. त्यामुळे हे शोधपथक नक्की सातारा येथून आले होते की दिल्ली वरून आले याबाबत प्रवाशांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, अशा संवेदनशील प्रकरणाबाबत पोलिसांनी दाखवलेली असंवेदना महाबळेश्वर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :Bombsस्फोटकेBus Driverबसचालक