शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महास्वच्छता अभियानात दहा हजार ग्रामस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:24 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सर्व शाळा आणि दहिवडीकर मिळून तब्बल दहा हजार ग्रामस्थांचा

ठळक मुद्दे स्वच्छ सर्वेक्षण : दहिवडीतील सर्व शाळांचा समावेश

 दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सर्व शाळा आणि दहिवडीकर मिळून तब्बल दहा हजार ग्रामस्थांचा पहिल्याच दिवशी सुंदर दहिवडी करण्यासाठी भाग घेणार आहेत.

दहिवडीतील जवळपास ५०ते ६० ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी जागा निवडल्या आहेत. यात २०० लोकांचा व शालेय मुलांचा एकगट, त्यासाठी शाळेचे ६ शिक्षक एक नरसेवक २ कर्मचारी असा ग्रुप तयार केला आहे.यासाठी लागणारी यंत्रसामग्री नव्याने खरेदी केली आहे. ज्यांना शक्य आहे, अशा लोकांनी, शालेय मुलांनी झाडू, फावडे, खुरपे, खराटे, घमेली उपलब्ध असल्यास घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाची भूमिका लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळे ग्रुप तयार केले आहे. तसेच स्वच्छ दहिवडी, सुंदर दहिवडीसाठी प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या जात आहेत.

पालिकेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक स्वत: अभियानात सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहेत. याला दहिवडीकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी स्वच्छता सुरू करून वातावरण निर्मिती केली आहे.महाश्रमदानामध्ये तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, खासगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, पतसंस्था, कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल, वकील, रिक्षा, जीप, संघटना, व्यापारी, व्यावसायिक, अंगणवाडी, सेविका, बचतगट, महिला, आर्ट आॅफ लिव्हिंग, पाणी फाउंडेशन टीम, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गणेश मंडळे यांना आमंत्रित केले आहे. दहिवडीत अनेक ठिकाणी स्वच्छतेची सुरुवात करण्यात आली आहे.स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी घंटागाडीचा वापरदहिवडी परिसरात अभियानाचा मोठा फिवर वाढत चालला असून, नगरपालिकेचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी, भिंतीवर डिजिटल बॅनरवर स्वच्छतेचे संदेश लावले आहेत. याशिवाय वासुदेवाच्या व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. घंटागाडी, रिक्षा यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.दहिवडी येथील विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर