आदर्की : फलटण पश्चिम भागात सोमवार, दि. २ रोजी सायंकाळी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस व गारपीठ होऊन वाठार-फलटण, सासवड-मुळीकवाडी येथे वीज तारा, झाडे पडल्याने बंद होता. मुळीकवाडी येथे पोल्ट्री फार्मचा पत्रा उडाल्यामुळे १० हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले. फलटण पश्चिम भागात बिबी, कोºहाळे, मुळीकवाडी, कापशी, आळजापूर, हिंगणगाव, सासवड, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक परिसरात सोमवार, दि. २ रोजी सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस, गारा, वादळी वार्याने झोडपून काढले. सासवड येथे वादळी वार्यामुळे ७ ते ८ घरावरील पत्रे उडाल्यामुळे संसार उघड्यावर पडले. मुळीकवाडी येथे मोठ्या प्रमाणात गारपीठ, वादळी वार्यामुळे झाडे उन्मळून पडली तर चर्तुभूत मुळीक यांचे पोल्ट्रीवरील पत्रा उडाल्यामुळे १० हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. बाबुराव चव्हाण, चर्तुभूज मुळीक जखमी झाले. लहूराम एकनाथ मुळीक यांचे ०१ खणावरील पत्रा उडून गेल्यामुळे घरातील धान्य, संसारोपयोगी साहित्य भिजले. तर लहूराज मुळीक किरकोळ जखमी झाले. जाधववस्ती येथील भवानी माता मंदिरावरील सर्व पत्रा उडून गेला. चंद्रकांत मुळीक यांना आपल्या गोठ्यावर गेले असताना गाराचा पाऊस, छपराचे लाकूड लागल्याने जखमी झाले. दशरथ मारुती भोसले यांचे सेट-नेट वार्यामुळे उडाल्याने १० लाख रुपयांचे नुकसान झाले. मधुबाई लालासो कदम यांचे गुरांच्या गोठ्याचा पत्रा उडून गेला. डाळिंब, पेरू बागांचे वीज वाहिन्या तुटल्याने नुकसान झाले. वाठार स्टेशन आणि आदर्की रस्त्यावर हणमंतवाडी येथे झाड पडल्याने रस्त्यावर विद्युत खांब पडू तारा रस्त्यावर वाहतूक दोन तास बंद होती. (वार्ताहर)
दहा हजार कोंबड्या मृत्युमुखी
By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST