शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ऊसवाहू ट्रॅक्टर-ट्रॉलीला टेम्पोची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:10 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाटेश्वरनगर येथे भरधाव चाललेल्या टेम्पोने ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहने महामार्गावरच ऊलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.

ठळक मुद्देऊसवाहू ट्रॅक्टर-ट्रॉलीला टेम्पोची धडक, दोन्ही वाहने ऊलटली पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाटेश्वरनगर येथे भरधाव चाललेल्या टेम्पोने ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहने महामार्गावरच ऊलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन महामार्गावरून कऱ्हाड बाजूने सातारा मार्गावरील अजिंक्यतारा कारखान्याकडे ऊस घेऊन निघाला होता. दुपारी दोन वाजता पाटेश्वरनगर (बोरगाव) येथे आला असता गोव्याहून पुण्याला प्लास्टिक भंगार घेऊन भरधाव निघालेल्या टेम्पोने त्यास पाठीमागून जोराची धडक दिली, ही धडक इतकी जोरात होती की उसाने भरलेली एक ट्रॉली व टेम्पो ही दोन्ही वाहने महामार्गावरच पलटी झाली.या अपघातात टेम्पो चालक विकास आनंदराव धुमाळ (वय २९, रा. सोनके, ता. कोरेगाव) हा किरकोळ जखमी झाला. त्यास इतर वाहनचालकांनी केबीनमधून बाहेर काढून नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रात दाखल केले. ट्रॉली आणि मालट्रक महामार्गावरच ऊलटी झाल्याने सर्वत्र ऊस पसरला असल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस स्टेशनचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम तसेच महामार्ग विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळ बोरगाव सेवारस्त्यावरून वाहतूक वळवून दिली. तद्नंतर महामार्गावर ऊलटी झालेली वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करून दिली. या अपघाताची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मनोहर सुर्वे तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर