शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

‘सुगम-दुर्गम’साठी शिक्षकांची राजकीय फिल्डिंग!

By admin | Updated: April 5, 2017 23:19 IST

जिल्ह्यांतर्गत बदल्या : गावांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

सातारा : शासनाने १५ मे २०१४ रोजी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम सुरू असून, सुगम भागातील जास्तीत जास्त गावे दुर्गम प्रकारात बसावीत, यासाठी शिक्षक मंडळींनी राजकीय फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा आहे. शिक्षकांच्या बदल्या तालुक्यांतर्गत होत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जिल्हा स्तरावरून ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्यांचे पूर्ण अधिकार असणार आहेत. दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. तर जे शिक्षक सुगम भागात वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत, त्यांच्या तणावात भर पडलेली आहे. ज्या शिक्षकांनी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त अधिक काळ सुगम भागात सेवा बजावली आहे, त्यांची बदली दुर्गम भागात केली जाणार आहे. तर ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावली आहे, त्या शिक्षकांना सुगम भागात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. जी गावे तालुका मुख्यालयापासून दूर आहे, दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यात सोई-सुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे ही अवघड क्षेत्रे म्हणून निश्चित करण्यात येणार आहेत. अवघड क्षेत्रे निश्चितीची कार्यवाही करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यातील सर्वसाधारण तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सुगम व दुर्गम गावे निवडण्यासाठी शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम अभियंता यांची कमिटी नेमली आहे. या कमिटीला गावे निवडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक शिक्षण विभागाने याद्या मागवल्या होत्या. त्यापैकी बहुतांश तालुक्यांतून याद्या जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. कामाच्या सोयीसाठी जास्तीत जास्त गावे दुर्गम भागांच्या यादीत बसावीत, यासाठी काही मंडळींनी आपले राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दुर्गम भागापेक्षा सुगम भागातीलच गावे मोठ्या प्रमाणावर या यादीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाले तर वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर हा अन्याय होऊ शकतो, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने शिक्षक बदल्यांबाबत धोरण ठरविणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)दुर्गमचा निकष कोणाला लागूमहाबळेश्वर, पाटण, जावळी हे पूर्ण तालुके तसेच सातारा तालुक्यातील घाटमाथ्यावरील गावे काम करण्यास प्रतिकूल आहेत. या भागात जंगली श्वापदे, साप, जळवा यांचा वावर असतो. पावसाळ्यात ओढे, नदी, नाले यांना पूर येतो. या भागातील अतिपावसाचा, पश्चिमेकडील डोंगराळ भाग, पश्चिम घाटात मोडणारी गावे, कऱ्हाड तालुक्यातील पश्चिम भाग, वाई तालुक्यातील जांभळी खोरे, धोम धरण परिसर हे दुर्गम व डोंगराळ क्षेत्रात मोडणारे विभाग आहेत. खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये दळणवळणाच्या सोयी निकृष्ट आहेत. अवर्षणग्रस्त विभाग असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असते. या गावांत पोहोचताना शिक्षकांना बरीच कसरत करावी लागते. या गावांचा दुर्गम गावांच्या यादीत समावेश होणे आवश्यक आहे, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. मुंबईत झाली बैठकजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदलींसदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी १0 वाजता ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.काय आहे सुगम-दुर्गमसुगम भागात १0 वर्षे व त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची दुर्गम व डोंगराळ भागात बदली करणे व ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात तीन किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावली असेल त्यांना सुगम भागात बदली करणे, हा शासनाचा उद्देश आहे.