शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

मारहाण करून शिक्षक पत्नीला घरात कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:01 IST

कौटुंबिक वादातून शिक्षक असलेल्या पत्नीला मारहाण करून घरात साडेसहा तास कोंडून ठेवल्याची घटना सातारा तालुक्यातील गोवे येथे उघडकीस आली. मात्र, शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून शिक्षिकेच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शिक्षिकेची सुटका झाली.

ठळक मुद्देमारहाण करून शिक्षक पत्नीला घरात कोंडलेशेजाऱ्यांची सतर्कता : पती पोलिसांच्या ताब्यात

सातारा : कौटुंबिक वादातून शिक्षक असलेल्या पत्नीला मारहाण करून घरात साडेसहा तास कोंडून ठेवल्याची घटना सातारा तालुक्यातील गोवे येथे उघडकीस आली. मात्र, शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून शिक्षिकेच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शिक्षिकेची सुटका झाली.याबाबत अधिक माहिती अशी, पूनम भोलेनाथ भोकरे (वय ३०, रा. गोवे, ता. सातारा) या सातारा तालुक्यातील एका शाळेवर शिक्षिका आहेत. तर त्यांचा पती एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री कौटुंबिक वादातून पत्नी पूनम भोकरे यांना पती भोलेनाथ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता बेडरुममध्ये नेऊन बाहेरहून कडी घातली. आतमध्ये मोबाइलही नसल्यामुळे त्यांना कोणालाही फोन करता आला नाही. दुपारी बारा वाजल्या तरी त्या घराबाहेर आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना शंका आली. त्यांनी डोकावून पाहिले असता त्यांना बेडरुममध्ये कोंडून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी थेट पूनम यांच्या वडिलांना हा प्रकार सांगितला.

वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना मदतीला घेतले. गोवे येथे जाऊन शिक्षिका पूनम यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पती भोलेनाथ भोकरे याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर