शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
3
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
4
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
5
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
6
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
7
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
8
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
9
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
10
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
11
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
12
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
13
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
14
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
15
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
16
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
17
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
18
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
19
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

पोलिसांची भूमिका पार पाडतायत शिक्षक

By admin | Updated: March 20, 2016 23:50 IST

महामार्ग ओलांडण्यासाठी मदत : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियंत्रणाचे काम

भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे भुर्इंज परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना अक्षरश: जीव मुठीत धरुन कसरत करावी लागत असल्याने येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षकच स्वत:चा वेळ खर्ची करुन नियमितपणे वाहतूक नियंत्रणाचे काम अव्याहतपणे करत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय अगदी महामार्गालगतच व गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यालयात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शाळेच्या वेळेत महामार्गालगत विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडत आहे. शाळेच्या वेळेत महामार्गावर एकही वाहतूक पोलिस आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. किंंबहुना रस्ता वाहतूक सुरक्षा हा विषयच संबंधित पोलिस विभागाच्या डायरीत नाही काय, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती आहे. मात्र येथील शिक्षकांनी पोलिसांच्या या असहकाराबाबत ओरड करण्याऐवजी पोलिसांची भूमिका स्वत:च बजावण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी दररोज ४ शिक्षक आपला वेळ खर्ची करुन रस्ता वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत. दोन्ही बाजूची वाहने थांबवून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास या शिक्षकांची होत असलेली मदत म्हणजे एक प्रकारची विद्यार्थीसेवाच आहे. प्रत्येक ५ ते १० मिनिटांनी ठराविक संख्येने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शिक्षक थांबलेले असतात. अनेकदा काही वाहनचालक या शिक्षकांना जुमानत नाहीत, मात्र तरीही हे शिक्षक त्याची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी इमान राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांनी या सेवेसाठी दिवस वाटून घेतले असून घरी लवकर जाण्याची घाई न करता त्यांच्याकडून सुरु असलेल्या या कामाबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी) पोलिसांनी इकडेही पहावेविद्यार्थ्यांसह सर्वच पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता आला पाहिजे. नागरिक म्हणून रस्ता सुरक्षासेवा हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यादृष्टीने हे काम वाहतूक पोलिसांचे असून ते मात्र भलत्याच कामात दंग असतात. त्यामुळे शिक्षकांचीही सेवा पाहून पोलिसांनी शाळा सुटण्याच्या वेळेत महामार्गावर आपले कर्तव्य बजवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.