शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

विधवा प्रथा बंदी: तांबवे ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:01 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या कौतुकाचा ठरावही करण्यात आला.

तांबवे : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयानंतर सातारा जिल्ह्यातील तांबवे या गावाने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे. स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाची ओळख आहे. जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीचा ठराव करण्याचा पहिला मान तांबवे गावाने मिळविला आहे.तांबवे ग्रामपंचायतीने आज, शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत हा ठराव केला. उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी ठराव मांडला, त्यास सदस्य जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिले आहे. यावेळी सदस्यांनी एकमताने ठरावास मंजुरी दिली. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेल्या ठरावाबद्दल कौतुकाचा ठरावही करण्यात आला.तांबवे ग्रामपंचायतीच्या ठरावात म्हटले आहे की, आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीच्या वेळी, पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.

या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे, तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी, त्यास या सभेची मंजुरी आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे हा ठराव करुन पहिले क्रांतिकारक पाऊल टाकले होते. याची दखल घेत राज्य सरकारने याचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्याचे अनुकरण आता सर्वत्र होऊ लागले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत