तांबवे : येथील सुशीला ज्ञानदेव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, दि. १९ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील, प्रसिद्ध व्याख्याते, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत व कऱ्हाड येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने तांबवे येथील गांधी चौक येथे शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन होईल. त्यानंतर खासदार पाटील, नितीन बानुगडे-पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. मोफत आरोग्य शिबिरामध्ये ईसीजी, बॉडी मास इंडेक्स, डायबेटीस, ब्लडप्रेशर, मूत्रविकार आदी तपासणी केल्या जाणार आहेत. या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष नयना खबाले-पाटील यांनी केले आहे.