शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गव्याच्या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी, ओझर्डे परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:48 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारपूस

कोयनानगर : पाटण तालुक्यातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा परिसरात गव्याने अचानक केलेल्या हल्ल्यात नवजा येथील ग्राम महसूल अधिकारी तलाठी अजय जाधव (वय ३०) हे जखमी झाले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अजय जाधव हे कराटे सजातील कामकाज उरकून बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून नवजा येथे घरी जात होते. ओझर्डे धबधबा परिसरात पोहोचताच अचानक एक गवा त्यांच्या गाडीसमोर आडवा आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ मोटारसायकल थांबवली. याच दरम्यान झुडपातून दुसरा गवा अचानक बाहेर येत त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ते मोटारसायकलवरून खाली पडले.घटनेनंतर त्यांनी मोबाइलवरून स्थानिक नागरिक व नातेवाइकांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत त्यांनी जाधव यांना प्रथमता मानाईनगर उपकेंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक तपासणी व उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी रंगनाथ असवले, संजय जंगम व इतर महसूल कर्मचारी तसेच वन्यजीव विभागाचे वनपाल बाबूराव कदम, लिपिक संतोष चाळके, वनरक्षक विश्वजीत पाटील, सुनील शिसाळ व विनायक कणसे हे जखमी जाधव यांचे सोबत रात्री उशिरापर्यंत होते. जखमी जाधव यांना वन्यजीव विभागाच्या वाहनातून उपचारासाठी कराडमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याने गुरुवारी पहाटे त्यांना घरी आणण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारपूसघटनेची माहिती मिळताच पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप तसेच वनक्षेत्रपाल अक्षय साळुंखे यांनीही जखमी जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस करत रात्रभर संपर्कात होते. कोयना भागात रानगवा व इतर वन्यप्राण्यांची वाढती वर्दळ व हल्ले चिंतेचा विषय ठरत असून वनविभागाने तातडीने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Forest Official Injured in Gaur Attack; Fear Grips Ozarde

Web Summary : A forest official was seriously injured in a gaur attack near Ozarde waterfall in the Patan region. The incident occurred while he was returning home on his motorcycle. He is now recovering in hospital. Locals are demanding increased patrols.