शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

डॉक्टरांनाही लळा ‘खाकी’चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:03 IST

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तरुणांमध्ये नेहमीच खाकी वर्दीचे आकर्षण असते. याला आता डॉक्टरही अपवाद राहिले नाहीत. पोलीस दलात सध्या बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस असे उच्च शिक्षण झालेले डॉक्टर कार्यरत असून, जिल्हा पोलीस दलाची मान या अधिकाऱ्यांमुळे आणखीनच उंचावली आहे.पोलीस शिपाई असो वा अधिकारी या पदांसाठी उच्चशिक्षित तरुणांची गर्दी असते. ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तरुणांमध्ये नेहमीच खाकी वर्दीचे आकर्षण असते. याला आता डॉक्टरही अपवाद राहिले नाहीत. पोलीस दलात सध्या बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस असे उच्च शिक्षण झालेले डॉक्टर कार्यरत असून, जिल्हा पोलीस दलाची मान या अधिकाऱ्यांमुळे आणखीनच उंचावली आहे.पोलीस शिपाई असो वा अधिकारी या पदांसाठी उच्चशिक्षित तरुणांची गर्दी असते. त्यामध्ये बीए, एमए, एमकॉम, एमएसस्सी, इंजिनिअर, वकील यांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र, सातारा जिल्हा पोलीस दलात सध्या काम करणारे अधिकारी हे चक्क डॉक्टर आहेत. डॉक्टर हा पेशा आरामदायी, प्रतिष्ठेचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आयपीएस पवन बनसोड, डीवायएसपी खंडेराव धरणे आणि पीएसआय पूजा शहा या तीन अधिकाºयांनी पोलीस खात्यातील आव्हानात्मक नोकरी स्वीकाली आहे. पोलीस दलात स्वत:ची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. यापूर्वीही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हेही डॉक्टर होते.परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी शरद पवार डेन्टल कॉलेज, नागपूर येथून बीडीएस शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पंतप्रधान फेलोशीपसाठी आसाम राज्यात ग्रामीण विकास या विषयावर तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळीच यूपीएससी परीक्षेची त्यांनी तयारी केली. २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांची आयपीएसपदी निवड झाली. सध्या ते साताºयात आपली सेवा बजावत आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी पोदार मेडिकल कॉलेज, मुंबई येथून बीएएमएस (आयुर्वेदिक) शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच प्रशासनात काम करण्याची त्यांची इच्छा होती. मेडिकलच्या शेवटच्या वर्षात असताना २००९ मध्ये एमपीएससीची जाहिरात सुटली. यावेळी अर्ज करून अभ्यासाची तयारीस सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात ते पास झाले. सध्या ते सातारा विभागात उपअधीक्षक म्हणून काम करीत आहेत.पोलीस उपनिरीक्षक पूजा शहा यांनी बीएचएमएसनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन मेडिसीनचे शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षे सातारा शहरात डॉक्टरची प्रॅक्टीसही केली. दरम्यान, त्यांना प्रशासकीय सेवेचे आकर्षण निर्माण झाल्याने त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. २०१३ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्या राज्यात महिलांमध्ये पंधराव्या आल्या. सध्या त्या सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षकपदी सेवा बजावत आहेत.मेडिकल क्षेत्राची व्यक्ती पोलीस खात्यात आल्यामुळे लोकाशी सहज समरस होत असते. संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे मेडिकल अँगलने त्यांना तपास चांगला करता येतो. त्यामुळे गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी मदत होत असते.-डॉ. पवन बनसोड, आयपीएस अधिकारीडॉक्टर पेशातील व्यक्ती पोलीस दलात असल्यामुळे खून, अपघात आणि इतर महत्त्वाच्या घटनांमध्ये शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक रिपोर्ट येण्यापूर्वी पटकन अंदाज बांधता येतो. तसेच तपासाला दिशा मिळणाचे मदत होत असते.-डॉ. खंडेराव धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारीगुन्ह्याचा तपास करताना नेहमी डॉक्टरच्या दृष्टिकोनातून पाहत असते. आरोपी व तक्रारदार यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले जाते. मेडिकलमध्ये फॉरेन्सिक विषय असल्याने तपास करत असताना इतरांच्या तुलनेत घटनेचे जलद आकलन होत असते.-डॉ. पूजा शहा,