शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: झाडानी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, जिल्हा प्रशासनाचे वाई प्रांताधिकाऱ्यांना पत्र

By दीपक शिंदे | Updated: June 12, 2024 19:07 IST

जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ६४० एकर जमिनीचा व्यवहार केला

सातारा : झाडानी, ता. महाबळेश्वर येथे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ६४० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. याठिकाणी ४० एकरांमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले आहेत.झाडानी येथील ग्रामस्थांची दिशाभूल करून जीएसटी आयु्क्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी गावातील ६४० एकर जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप करून याठिकाणी ४० एकरांत अनधिकृत बांधकाम आणि कमाल जमीन धारणा कायदा उल्लंघनप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली होती. तसेच याप्रकरणी विविध ठिकाणी तक्रारीही केल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना नोटीस बजावून ११ जूनला कागदपत्रांसह लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात कमाल जमीन धारणाचा उल्लेख होता. त्यानुसार दि. ११ रोजी सुनावणी होऊन आता दि. २० जूनला सुनावणी होणार आहे. तथापि, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांना झाडानी येथील ६२० एकरांपैकी ४० एकरांत झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी पत्र पाठवले आहे. यामध्ये वाई प्रांतांच्या अहवालानुसार झाडानीतील ४० एकरांत अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. या बांधकामावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील ४५ अन्वये नियमानुसार कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश दिले आहेत.दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर व संवेदनशील क्षेत्रातील जंगलतोड, खाणकाम, बांधकाम, खोदकाम तसेच कोअर क्षेत्रातील वेळे, देऊर, मळे, कोळणे, पाथरपुंज, खिरखिंडी, गोठणे, कुंडी, खुंदलापूर, आदी गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न, बफर क्षेत्रातील १८ नागरी सुविधा, व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी करणे, कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी रुग्णवाहिका सेवा, नवजा (ता. पाटण) येथील ओझर्डे धबधब्याचे व्यवस्थापन स्थानिक जनवन समितीकडे द्यावे, हिंस्र वन्यजिवांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांना तत्काळ मदत, वासोटा किल्ला, ओझर्डे धबधबा परिसरात प्लास्टिक संकलन केंद्राची उभारणी, आदी मागण्या मोरे यांनी उपोषणादरम्यान केल्या होत्या. या मागण्यांबाबत कार्यवाही होत असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय