शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

फलटणमध्ये माउलींसाठी प्रतिकात्मक समाजआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:02 IST

sant dnyaneshwar palkhi Satara : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये  विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली.

ठळक मुद्देफलटणमध्ये माउलींसाठी प्रतिकात्मक समाजआरती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा यंदाही रद्द

फलटण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये  विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली.जिल्ह्यात संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या तरडगावच्या मुक्कामानंतर माऊलींचा सोहळा फलटणकडे रवाना होतो. आजच्या दिवशी फलटण येथील विमानतळ परिसरातील पटांगणावर लाखो वारकरी विसावा घेतात.

यंदा मात्र वाढत्या कोरोनामुळे शासनाने सोहळा रद्द केल्याने पालखी निघाली नसली तरी तिथीप्रमाणे ज्या त्या गावात प्रति सोहळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी पालखी तिथीप्रमाणे फलटणला येत असल्याने फलटणमध्ये पालखी ज्या ठिकाणी विसावते त्या ठिकाणी म्हणजे विमानतळावर प्रतिकात्मक सोहळा समाजआरती करून साजरा करण्यात आला.ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करण्यात आला. ही समाज आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून करण्यात आली. भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, अजय माळवे, विराज खराडे, बबनराव निकम, जीवन केंजळे, डॉ. सुनीता खराडे, बाळासाहेब ननवरे, किरण बोळे, दादासाहेब चोरमले, युवराज शिंदे, अभिजित सोनवणे उपस्थित होते. 

टॅग्स :sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीphaltan-acफलटणReligious Placesधार्मिक स्थळेSatara areaसातारा परिसर