शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पुरात पोहताना युवक वाहून गेला, मर्ढे येथील घटनेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:21 IST

कृष्णा नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत युवकाचा थांगपत्ता लागला नाही.

ठळक मुद्देनदीच्या पुरात पोहताना युवक वाहून गेला, मर्ढे येथील घटनेने खळबळपोलीस व ग्रामस्थांकडून शोध मोहीम सुरू

सातारा : कृष्णा नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत युवकाचा थांगपत्ता लागला नाही.धीरज तुकाराम शिंगटे (वय १९, रा. मर्ढे, ता. सातारा) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मर्ढे येथील कृष्णा नदीच्या पुरामध्ये दहा ते बारा मित्रांसमवेत धीरज हा पोहण्यासाठी गेला होता. मर्ढे येथील पुलावरून मुले खाली उड्या टाकत होती. त्यावेळी धीरजनेही पुरामध्ये उडी घेतली. इतर मुलेही त्याच्या पाठोपाठ नदीत उड्या घेत होती.

पोहत असताना अचानक धीरजला दम लागला. त्यामुळे तो पुराच्या पाण्यात गटांगळ्या घेऊ लागला. तो बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या आधीच तो पाण्यात बुडून दिसेनासा झाला. या घटनेची माहिती मर्ढे गावात मिळताच नदीकाठी ग्रामस्थांसह महिलांनीही गर्दी केली होती.

कृष्णा नदीच्या काठावरून लिंब, गोवे, वनगळ या परिसरामध्ये ग्रामस्थ आणि पोलिसांनीही त्याचा शोध घेतला. मात्र, तो अखेर सापडलाच नाही. रात्री उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर