शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटले, मिठाईचे दुकान उडविले; कामगार गंभीर जखमी, सातारा बसस्थानकात अपघात

By दत्ता यादव | Updated: June 1, 2024 13:10 IST

आणखी दोन ठिकाणी एसटीचे अपघात

सातारा: सातारा बसस्थानक आज, शनिवारी सकाळी झालेल्या अपघाताने हादरून गेले. फलाटावर बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने मिठाईचे दुकान उडविले. यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाला. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, खंडाळा आणि कऱ्हाड येथे एसटीचे आणखी दोन अपघात झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-कोल्हापूर एसटी (एमएच ०७सी ९२२३) शनिवारी सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी बसस्थानकात आली. फलाट क्रमांक १४ वर चालक एसटी उभी करत असताना अचानक एसटीचा वेग वाढला. फलाटावर असलेल्या मिठाई दुकानावर एसटी जोरदार धडकली. यात दुकानातील कामगार देविदास सोनटाके (वय ३५, रा. लातूर) याच्या पायाला गंभीर जखम झाली. फलाटावर अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. तर दुकानातील मिठाई व इतर वस्तू खाली पडल्याने मिठाई दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. हा अपघात झाला तेव्हा बसस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले होते. अपघातानंतर मोठा आवाज होताच प्रवाशांच्या काळजात धस्स झालं. काही प्रवासी फलाटावरील बाकड्यावर बसले होते. सुदैवाने मिठाईच्या दुकानाला उडवून एसटी आतमध्ये गेली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असं प्रवाशांनी सांगितले. या अपघातानंतर जखमी दुकानातील कर्मचाऱ्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खंडाळा आणि कऱ्हाड या भागातही शनिवारी सकाळी एसटीचे दोन अपघात झाले. मात्र, त्यामध्ये किती जखमी झाले, हे अद्याप समोर आले नाही.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात