शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाडल्या ऊसतोडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:39 IST

पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.

ठळक मुद्देवाठार, काले, आटके परिसरात आंदोलन दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी न घेण्याचे केले आवाहन

कऱ्हाड ,दि. ०४ : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानीचे नेते अनिल घराळ, कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम आदींची उपस्थिती होती.

गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत. ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगीही कऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथून गत आठवड्यापूर्वी पडली होती. हबरवाडी येथे शुक्रवारी होत असलेली ऊस वाहतूक रोखत टॅक्टर-ट्रॉलीतील चाकांतील हवा कार्यकर्त्यांनी सोडली होती. त्यानंतर शनिवारी (दि. ४) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाठार, काले, आटके परिसरात आंदोलन केले.

कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काले परिसरातील उसतोड सुरू असलेल्या पाच फडात जाऊन तोडी बंद पाडल्या. तसेच शेतकऱ्यांना जोपर्यंत उसाचा पहिला हप्ता ३ हजार ४०० रुपये कारखान्यांकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत तोडी घेऊ नये, असे आवाहन केले.

 

माझ्या शेतात आज ऊसतोड सुरू होती. मात्र या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी त्यांच्या आंदोलनामागची भूमिका मला पटवून दिली. त्यावेळी मी स्वत:हूनच ऊसतोडणी बंद करायला परवानगी दिली आहे. कारखानदार उचल जाहीर करत नसल्यामुळे संघटनांना आंदोलन करावे लागत आहे. यात सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.- शशिकांत यादवशेतकरी, काले

 

उसाची पहिली उचल ३ हजार ४०० रुपये जाहीर करा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली आहे. मात्र, कारखानदार त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. उचल जाहीर न करताच अनेकांनी ऊसतोडणी सुरू केलेली आहे. आपला ऊस लवकर जावा, या भूमिकेने काही शेतकरीही बळी पडत आहेत. ही बाब चुकीची असून, शेतकऱ्यांनी स्वत:च्या हितासाठी स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, आम्ही शांत मार्गाने आंदोलन करीत आहोत. मात्र, कारखानदारांनी आडमुठेपणा सोडला नाही तर आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.- विकास पाटीलजिल्हा प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी