शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील पालिकांचे कामबंद आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:06 IST

नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू होते.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील पालिकांचे कामबंद आंदोलन स्थगितसातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन स्तरावर निर्णय

सातारा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू होते.नगरपरिषद व नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने दि. १ जानेवारी रोजी संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला जिल्ह्यातील पालिका व नगरपंचायतींनीही पाठिंबा दर्शविला.सातारा, कऱ्हाड , फलटण, महाबळेश्वर, पाचगणी या पालिका व वडूज, खंडाळा या नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाची पालिका अप्पर प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुंबई येथे भेट घेतली.

 संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करीत पालिका कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या मान्यतेच्या अध्यादेशात समावेश करण्याचे आश्वासन दिले. हा अध्यादेश सर्व पालिकांना माहितीसाठी पाठविण्यात आला आहे. मागण्या मान्य केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालिका कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत कामकाज सुरू केले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर7th Pay Commissionसातवा वेतन आयोग