शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

आदित्य ठाकरे दूर, अगोदर निष्ठावंतांशी दोन हात करा, सुषमा अंधारेंचे मंत्री शंभूराज देसाईंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 15:41 IST

देसाई यांच्याशी माझे भांडण हे वैयक्तिक नाही ते लोकहिताचे

राजेंद्र लोंढे

मल्हारपेठ : ‘पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यापेक्षा अगोदर पाटणमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निष्ठावंतांशी दोन हात करावेत,’ असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.मल्हारपेठ, ता. पाटण येथे महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या. अंधारे पुढे म्हणाल्या, ‘शंभूराज देसाई हे आपल्या आजोबांच्या विचाराच्या विरोधात काम करत आहेत. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारही कधी कळला नाही. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले. हे दोन मोठ्या माणसांतील भांडण होते. यामध्ये शंभूराज देसाई यांनी पडण्याचे काहीच कारण नव्हते.शंभूराज देसाई हे दोन वेळा मंत्री आणि तीन वेळा आमदार ज्यांच्यामुळे झाले, अशा लोकांच्या विरोधातही बोलतात असे सांगून अंधारे पुढे म्हणाल्या, देसाई यांच्याशी माझे भांडण हे वैयक्तिक नाही ते लोकहिताचे आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांनी येथेच त्यांच्यासाठी सभा घेतली होती, म्हणून ते निवडून आले. आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्यासाठी कोण सभा घेणार हा विषय आहे. भाजपबरोबर ते गेले. भाजपने ईडीचा गैरवापर सुरू केला आहे. आतापर्यंत भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडी लागली. पण, ते भाजपबरोबर गेल्यानंतर ईडीची चाैकशी थांबली. सतत महागाई वाढविणाऱ्या या सरकारला जाब विचारण्याची आवश्यकता आहे. कारण, सातबारा उतारा बघून दोन हजार रुपये दिले जातात. धान्याच्या नावाखाली पैसे देणार आहेत. त्याचबरोबर गहू आणि तांदूळ लोकांना दिला जातो. तो जनावरेही खाणार नाहीत, अशा पद्धतीचा आहे. यामुळे लोकांनाच आता याचा विचार खऱ्या अर्थाने करावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSushma Andhareसुषमा अंधारेShambhuraj Desaiशंभूराज देसाई