शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य : चक्क दगड मारल्याने वाचला महिलेचा जीव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:19 IST

झाडाला साडी बांधून एक महिला आत्महत्या करत असतानाच अजिंक्यताऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून दगडफेक केली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने झाडाला साडी तशीच सोडून तेथून पलायन केले.

ठळक मुद्देसाताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावरील घटना साडी झाडाला सोडून महिलेचे पलायन

सातारा : झाडाला साडी बांधून एक महिला आत्महत्या करत असतानाच अजिंक्यताऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून दगडफेक केली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने झाडाला साडी तशीच सोडून तेथून पलायन केले.याबाबात अधिक माहिती अशी, अजिंक्यताऱ्यावर सायंकाळच्या सुमारास अनेकजण फिरण्यासाठी जातात. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यातील पाच ते सहाजणांचा ग्रुप चालत अजिंक्यताऱ्यावर निघाला होता. त्यावेळी एका ओढ्यामधील झाडाला साडी बांधून संबंधित महिला आत्महत्येचा प्रयत्न करत होती. त्या महिलेने गळ्याला साडी गुंडाळली होती.

या प्रकार एका ज्येष्ठ नागरिकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आणखी चार ते पाचजणांनी मोठ- मोठ्याने आरडाओरड सुरू केली. तरी सुद्धा संबंधित महिला ओढ्यामध्ये स्वत:ला झोकून देण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे नागरिकांनी हातात दगड घेऊन महिलेच्या दिशेने भिरकावले.

भयभीत झालेल्या महिलेने अखेर गळ्याभोवती गुंडाळलेली साडी कशीबशी सोडून तेथून पळ काढला. संबंधित महिला विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे आम्ही तिचा शोध घेण्यासाठी पुढे गेलो नाही, असे एका ज्येष्ठ नागरिकाने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर