शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश जाधव काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:16 IST

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व खटाव काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुरेश जाधव काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्षदीर्घकाळापासून रिक्त होते काँग्रेस कमिटीचे पद

सातारा : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व खटाव काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी नियुक्तीचे पत्र डॉ. सुरेश जाधव यांना ई मेलने पाठविले आहे. दीर्घकाळापासून काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर प्रदेश कार्यालयाने डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती केली आहे.डॉ. सुरेश जाधव हे १0 वर्षे खटाव तालुक्यातील पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. १९९७-९८ मध्ये त्यांनी खटाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे खटाव तालुका प्रदेश प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले.

श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून त्यांनी ८ वर्षे काम पाहिले आहे. गेल्या १६ वर्षांपासून ते देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून २५ वर्षे त्यांनी काम केलेले आहे. गेल्या १५ वर्षांपासून खटाव तालुका काँग्रेस  कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

जिल्ह्यातील काँग्रेस वाढविण्यावर माझा भर राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील विकासकामांसाठी जेवढा जास्त निधी आणता येईल, तेवढा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस पक्षाशी सामान्य नागरिकांची नाळ पूर्वीपासूनच आहे. ती आणखी बळकट करणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व वाढविणार आहे.- डॉ. सुरेश जाधव, प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी 

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर