शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाडात जीवघेणा उद्योग; वाहनात भरला जातोय घरगुती गॅस सिलिंडर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:59 IST

दोन ठिकाणी मिळून २८ सिलिंडरसह मशीन जप्त : बनवडी फाट्यावर बेकायदा गॅस भरणाऱ्यांवर पुरवठा शाखेची कारवाई

कऱ्हाड : कऱ्हाड शहर व तालुक्यात बेकायदेशीरपणे रिक्षा, तसेच इतर वाहनांमध्ये गॅस भरण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. यावर गुरुवारी पुरवठा शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम राबवण्यात आली. सकाळी सुमारे दहा वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील भागात एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणाहून ३ सिलिंडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.याप्रकरणी बाबासाहेब मुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी बनवडी फाटा येथे बेकायदा गॅस भरणाऱ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत २५ सिलिंडर आणि रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी २ मशीन जप्त करण्यात आली आहेत.शहराजवळील बनवडी फाटा येथील एका हॉटेलच्या मागील बाजूस बंद खोलीत बेकायदेशीरपणे रिक्षा वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडी आणि पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांना मिळाली.  त्यांनी जागामालक युवराज माळी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, जागामालकांनी बंद खोलीचे कुलूपची चावी नसल्याचे सांगितले.

नंतर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत मिळून बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये २५ गॅस सिलिंडर आणि दोन मशीन जप्त करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई करताना बनवडी पोलिस पाटील रोहित पाटील, तलाठी वैभव शितोळे, कर्मचारी महादेव पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

एवढ्या गॅस टाक्या कोठून येतात? कऱ्हाड शहरात गॅस टाक्यांचा पुरवठा करणाऱ्या एका गॅस एजन्सीकडून तब्बल २५ सिलिंडर बनवडी फाटा येथे आढळले. यात १९ सिलिंडर भरलेले, तर ५ सिलिंडर रिकामे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सिलिंडर एजन्सीकडून कशा प्रकारे एकाच ठिकाणी वितरित करण्यात आले. याबाबत शंका निर्माण होत आहे.

दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा घरगुती गॅस सिलिंडरचा रिक्षामध्ये वापर करणे किंवा त्यातून गॅस भरणे, हे बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर कृत्यासाठी कायद्यात कारवाईची तरतूद आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, गॅस पुरवठादेखील खंडित केला जाऊ शकतो. याशिवाय तुमच्यावर गुन्हेगारी खटलादेखील दाखल होऊ शकतो.