आदर्की : आदर्की महसुली मंडलात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान्याला दर नसल्याने सूर्यफुल या तेलवर्गीय पिकाची पेरणी केली. पीक जोमात आले; पण पावसाने पाठ फिरवल्याने कोमात गेल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की महसुली मंडलात खरीप हंगामात बाजरी, मूग, चवळी, घेवडा, लाल कांद्याचे पीक घेतले जाते. पण, बाजरी व कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल आदी तेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली. दोन-तीन पाऊस पडल्याने पिकांची उगवण व वाढ समाधानकारक झाली. मात्र गेल्या पंधरा-वीस दिवसांत पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल आदी पिके सासवड, बिबी, आदर्की परिसरात सुकायला लागली आहेत. शेतकऱ्यांनी पीक बदल करूनही उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
फोटो २७आदर्की
आदर्की परिसरात सूर्यफुल पाण्याअभावी सुकायला लागले आहे.