शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:59 IST

सातारा येथील शाहूपुरीमधील सरस्वती कॉम्पलेक्समध्ये वास्तव्यास असणाऱ्या यश दिलीप गिरमकर (वय १५) या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक असणाऱ्या यशच्या मृत्यूमुळे गिरमकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोळला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्याकारण अस्पष्ट : पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : येथील शाहूपुरीमधील सरस्वती कॉम्पलेक्समध्ये वास्तव्यास असणाऱ्या यश दिलीप गिरमकर (वय १५) या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक असणाऱ्या यशच्या मृत्यूमुळे गिरमकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोळला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश गिरमकर हा मुळचा मुंबई येथील रहिवाशी आहे. त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे तो शाहूपुरीतील त्याच्या वडिलांच्या बहिणीकडे पाचवीपासून राहात होता. नववी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सुटीमध्ये खासगी क्लासही लावले होते.

शहरातील एका इंग्रजी माध्यमच्या शाळेत तो शिकत होता. शुक्रवारी रात्री त्याने त्याच्या अत्त्याला ढोकळा खायचा आहे, असा हट्ट धरला. त्यामुळे त्याच्या अत्त्याने त्याला ढोकळा खायला दिला. काही वेळानंतर तो अभ्यासासाठी म्हणून त्याच्या खोलीत गेला. मात्र, बराचवेळ झाला तरी तो खोलीबाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या अत्त्याने दरवाजा ठोठावला असता आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांना बोलविल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता यशने ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.यशने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्याच्या वडिलांकडे आणि अत्त्याकडे चौकशी करत आहेत. येत्या १६ जूनला यशचा वाढदिवस होता. या वाढदिवसासाठी त्याचे वडील मुंबईहून साताऱ्यात येणार होते. दहावीमध्ये चांगली टक्के मिळवलीस की, तुला गाडी आणि मोबाईल घेणार, असे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. त्याने तशी तयारी दर्शवून अभ्यासही सुरू केला होता. असे असताना त्याने टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न त्याच्या वडिलांसह गिरमकर कुंटुबाला पडला आहे.यशचा कोर्टाकडून ताबा !यशच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी यशचा न्यायालयाकडून ताबा घेतला होता. आईचे प्रेम त्याला मिळालेच नाही. अत्या हीच त्याची आई होती. लहानपणापासून तो फारसा कोणाशी बोलायचाही नाही. एकटे राहणे तो पसंत करत होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर