शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सातारा : एसटी वाहकाची बसस्थानकात आत्महत्या, फसवणूक झाल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:32 IST

पाटण आगारात कार्यरत असलेले वाहक नानासाहेब ताईगडे (वय ५७) यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आर्थिक फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.

ठळक मुद्देएसटी वाहकाची बसस्थानकात आत्महत्याछताला गळफास : फसवणूक झाल्याचे कारण

ढेबेवाडी : पाटण आगारात कार्यरत असलेले वाहक नानासाहेब ताईगडे (वय ५७) यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आर्थिक फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.तळमावले येथील रहिवासी असलेले नानासाहेब ताईगडे हे पाटण आगारात अनेक वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत आहेत. ते शुक्रवारी पाटण-ढेबेवाडी ही मुक्कामी बस घेऊन आले होते. रात्री जेवण करून नानासाहेब आणि याच बसचे चालक रमेश पवार हे दोघेही एसटीमध्येच झोपले. याच बसस्थानकात पाटण आगाराची दुसरीही बस मुक्कामी होती.

त्या बसचे वाहक गजानन कचरे हे पहाटे तीनच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता त्यांना बसस्थानकाच्या छताला कोणी तरी गळफास घेतल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ही माहिती अन्य सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर सर्वजण त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाहिला असता ते नानासाहेब ताईगडे असल्याचे निदर्शनास आले. चालक, वाहकांनी घटनेची माहिती माहिती पाटणच्या आगारप्रमुखांना दिली.

तसेच ढेबेवाडी पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र्र साळुंखे तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर