शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. ज्याचा सरकारी कमानीला झेंडा ! अजब प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्काराच्या फोटोचे भांडवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:20 IST

‘जे नसे ललाटी...ते लिखे तलाठी,’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. या तलाठी मंडळींनी तहसील कार्यालयाची कमानच जाहिरात फलक लावण्यासाठी वापरली आहे.

सातारा : ‘जे नसे ललाटी...ते लिखे तलाठी,’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. या तलाठी मंडळींनी तहसील कार्यालयाची कमानच जाहिरात फलक लावण्यासाठी वापरली आहे.जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळालेले तब्बल चारजण आहेत. ९९ टक्के गुण मिळविणारेही मोठ्या संख्येने आहेत. तर ९० टक्क्यांच्यावरील गुणवंतांची तर गणनाच नाही; पण या गुणवंतांचे सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करत विद्रूपीकरण करणारे फलक लागलेले दिसले नाहीत.सातारा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या मंडलाधिकाऱ्याच्या मुलाचे कौतुक सोहळे भलत्याच पद्धतीने सुरू आहेत. येथील मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ यांचा मुलगा समिप याला दहावी परीक्षेत ९८.४० टक्के गुण मिळाले. याचे भले मोठे कौतुक समस्त तलाठी मंडळींना वाटले. आनंदाच्या भरात त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयाची कमानच फलक लावायला निवडली. इतक्या निवडणुका होतात, मंत्र्यांचे दौरे होतात; पण त्यांच्या स्वागताचे किंवा शुभेच्छांचे फलक कमानीवर कधी लागलेले दिसले नाहीत. इथे मात्र मंडलाधिकाºयाच्या मुलाच्या यशाचे भलतेच कौतुक कोण वर्णावे, असेच म्हणत उंचच्या उंच कमानीवर फलक लावला आहे.

तहसील कार्यालयात प्रवेश करत असतानाच कमानीवर लटकणारा भलामोठा फलक दिसतो. या फलकावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते सत्कार स्वीकारतानाचा फोटो आहे. आपल्या हस्ते झालेल्या सत्काराचा फोटो कमानीवर लागेल, याची कल्पना तरी जिल्हाधिकाऱ्यांनी केली असेल काय?, महसूल कर्मचाऱ्यांनी कसेही वागले तरी चालते, याच ठिकाणी सर्वसामान्याच्या मुलाचा फलक लागला असता तर तो प्रशासनाला सहन झाला असता का?, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच इतरांनाही फलक लावायला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.हे विद्रूपीकरण नाही काय?  सार्वजनिक ठिकाणी फलक उभारून विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. इथे तर शासकीय मालकीच्या कमानीवर फलक लावण्याचा प्रकार झाला आहे. याबाबत कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही.ही कमान उंच आहे. शासकीय कमानीवर फलक लावण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने फलक लावणाºयांनी गे्रड सेपरेटरच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या हायवा ट्रक या ठिकाणी आणला होता. या हायवा ट्रकच्या टपावर चढून फलक लटकवण्यात आला आहे.सातारा तहसीलदार कार्यालयाच्या कमानीवर लावलेला फलक.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी