शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 09:55 IST

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे.

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत पडून एक इसम तब्बल दोन रात्र असहायपणे तळमळत राहिला. त्याला वाचवण्यासाठी खाली गेलेले दोन पोलीस कर्मचारीही एक रात्र खाली अडकून पडले. अखेर या तिघांनाही दरीतून बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना यश आलं आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी कोडोली येथील संभाजी जाधव हा इसम अजिंक्यताऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र, अजिंक्यताऱ्याच्या पाठीमागील दरीत पाय घसरून तो खाली गडगडत गेला. शुध्दीवर आल्यानंतर त्याने ओरडायला सुरूवात केली, मात्र त्या भागात कोणीही आले नाही. शनिवारची रात्र आणि रविवारचा दिवस तसाच गेला. रविवारी सायंकाळी काही युवक गडावर फिरायला आले असताना खाली दरीत एका इसमाचा  आवाज आवाज ऐकून त्यांनी मोबाइलवरून पोलिसांना माहिती दिली.  त्यानंतर दोन पोलीस कर्मचारी शोध घेत जखमीपर्यंत पोहचले, परंतु त्या व्यक्तीला घेऊन पुन्हा वर येणे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना शक्य झाले नाही. पोलिसही रविवारी रात्रभर खाली दरीतच अडकले. अखेर कोडोली पोलीस चौकीचे फौजदार कदम यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. कार्यकर्ते सोमवारी पहाटे अजिंक्यता-यावर पोहचले. त्यांनी जखमी संभाजीसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही दरीतून बाहेर काढले. 

 या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते अनिल केळगणे, संजय पार्टे,  सुनिलबाबा भाटिया, सनी बावळेकर, निलेश बावळेकर, प्रवीण जाधव, दृवास पाटसुते यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर