शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

माढा मतदारसंघात आघाडीत वजाबाकी, युतीसाठी बेरीज; राजकीय भूकंपानंतर चित्र बदललं 

By नितीन काळेल | Updated: July 10, 2023 19:27 IST

शरद पवार यांनी बारामती ऐवजी माढ्यातून निवडणूक लढवत विजय मिळविला होता

सातारा : राज्यातील राजकीय स्थित्यंतर नंतर सर्वच मतदारसंघाचे चित्र बदलले असून माढा लोकसभेसाठी ही नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे. कारण, अजितदादा महायुतीत गेल्याने त्यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला असून त्यातील तिघेजण माढ्यातील आहेत. त्यामुळे सर्व सहा आमदार युतीत राहणार असल्याने माढ्यात आघाडीची वजाबाकी तर युतीत बेरीज झाली आहे. तरीही अजूनही काही काठावर आहेत.माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा आणि माळशिरस हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश या मतदारसंघात होतो. सध्या या मतदारसंघाचे खासदार फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार व सध्याचे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा पराभव केला होता. खरेतर माढा लोकसभा मतदारसंघ पूर्वी कधीही युतीसाठी अनुकूल नव्हता. आघाडीच येथे दमदार होती. पण, भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ आल्यानंतर बेरजेचे आणि फोडाफोडीचे राजकारण करुन त्यांनी ताकद निर्माण केली. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत त्यांची डाळ शिजली. आता माढ्याच्या उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीतून कोण ? यावर चर्चा सुरू झाली होती. भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळणार असे चित्र होते. तर राष्ट्रवादीतून रामराजे नाईक-निंबाळकर दावेदार होते. मात्र, राज्यातील राजकीय भूकंपानंतर माढा मतदारसंघाचे चित्र बदलले आहे.शरद पवारांनी नेतृत्व केलेले...माढ्याच्या अस्तित्वानंतर प्रथमच २००९ ला निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती ऐवजी माढ्यातून निवडणूक लढवत विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख यांचा पराभव केलेला. तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष