शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

विषय आहे खोल खोल ..बजेटचा आवाज ढोल ढोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:03 PM

सातारा : सातारा नगरपालिकेची सभा गुरुवारी भलतीच गाजली. कविता अन् चारोळी लिहलेल्या साहित्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. एकीकडं करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पस्तीस लाखांच्या प्राणायम हॉलवर हल्लाबोल चढवला. सातारा नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम ...

ठळक मुद्देसातारा नगरपालिकेच्या सभेत मेंबर बनले साहित्यिक करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या सदस्यांचा सभात्याग

सातारा : सातारा नगरपालिकेची सभा गुरुवारी भलतीच गाजली. कविता अन् चारोळी लिहलेल्या साहित्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. एकीकडं करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पस्तीस लाखांच्या प्राणायम हॉलवर हल्लाबोल चढवला.

 सातारा नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम होत्या. या सभेत करवाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. 'पूर्वीच्या बजेटच्या सभेत आम्ही या बेकायदेशीर करवाढीला कडाडून विरोध केला होता, तरीही ही बेकायदेशीर करवाढ कोणतीही परवानगी नसताना तुम्ही परस्पर सातारकरांवर कशी काय  कशी काय लादू शकता ?', असा सवाल नगरविकास आघाडीच्या अशोक मोने यांच्यासह इतर काही नगरसेवकांनी विचारला. पाणीपट्टी करात वाढ याबरोबरच स्वच्छता कर आणि अग्निशमन कर असे एकूण तीन विषय या सभेत मोठ्या गोंधळात चर्चिले गेले. विशेष म्हणजे प्रत्येक सभेत काहीतरी वेगळं करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे हे आज जणू साहित्यिक बोलून आले होते. 'विषय आहे खोल खोल.. बजेटचा आवाज वाजेना ढोल ढोल' ही आगळी वेगळी कविता लिहिलेला फ्लेक्स त्यांनी सभागृहात आणला होता. तसेच ,'गोरे नाहीत.. गोडबोले आहेत,' हे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बाबतीत लिहिलेले  कापडही त्यांनी आपल्या शरीराभोवती गुंडाळले होते. तसेच शहरातील रस्त्यांवर रोज बंद चालू होणारा एलईडी बल्ब दाखवण्यासाठी चक्क बॅटरीला लावलेला एक एलईडी स्ट्रीट लाईट सभागृहात आणला होता. शेवटी सत्ताधारी शहर विकास आघाडीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत नगर विकास आघाडीचे सर्व सदस्य सभात्याग करून बाहेर पडले. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. सभापती वसंत लेवे यांच्या वॉर्डात पस्तीस लाख रुपये खर्चून मेडिटेशन हॉल अर्थात प्राणायम इमारत बांधली जात असल्याबद्दल प्रचंड गोंधळ निर्माण झाला. 'एकीकडे सध्या अस्तित्वात असलेली आहे ती मालमत्ता व्यवस्थित सांभाळता येत नाही, तेव्हा पालिकेने हा नवा उद्योग का करावा ?' असा सवाल यावेळी करण्यात आला.