शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजाराची लाच स्वीकारताना साताऱ्यात सह दुय्यम निबंधक लाचलुचतपच्या जाळ्यात

By दत्ता यादव | Updated: May 10, 2023 14:34 IST

नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच

सातारा : नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना सह दुय्यम निबंधक उदय धनाजी सूर्यवंशी (वय ४२, रा. पुणे) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, बुधवारी सकाळी दहा वाजता करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तक्रारदाराला नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करायची होती. त्यासाठी संबंधित तक्रारदार दुय्यम निंबधक कार्यालयात गेले होते. त्यावेळी सह दुय्यम निंबधक उदय सूर्यवंशी याने तक्रारदाराकडे पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे १५०० रुपये लाचेची मागणी केली. या प्रकारानंतर संबंधित तक्रारदाराने साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन रीतसर लेखी तक्रार दिली.त्यानंतर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून १५०० हजारांची लाच घेताना सह दुय्यम निबंधक उदय सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत नलावडे, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी