शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

स्पर्धा परीक्षेसाठी तीन महिने विद्यार्थी मुक्कामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मेंढ्यांच्या मागे गेलेल्या पालकांच्या लेकरांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून स्वानुभवातून शिक्षण असो अथवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मेंढ्यांच्या मागे गेलेल्या पालकांच्या लेकरांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून स्वानुभवातून शिक्षण असो अथवा स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना तीन महिने स्वत:च्या घरी नेणं असो भारती ओंबासे कुठंच कमी पडल्या नाहीत. महिलांसाठी अनफिट असलेल्या शाळेत जाण्याचं आव्हान स्वीकारून त्यांनी ही शाळा सुपरहिट करून दाखविली.

माण तालुक्यातील दरावस्ती (टाकेवाडी) ही जिल्हा परिषदेची शाळा महिलांसाठी अनफिट म्हणून जाहीर करण्यात आली होती. जिल्हा आऊट बदली घेण्यापेक्षा या दुर्गम शाळेत जाऊन वेगळा अनुभव मिळवावा, या उद्देशाने भारती ओंबासे २०१८ मध्ये या शाळेत रूजू झाल्या. दऱ्यात वसलेली म्हणून दरावस्ती असं नाव असलेल्या या शाळेचा पट तेव्हा अवघा १२ होता. वस्तीवर आजी, आजोबा आणि नातवंडं यांचे वास्तव्य असल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच होती. महिलांसाठी अनफिट असलेल्या शाळेचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या भारती ओंबासे यांनी या शाळेत आल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लावली. बीडीएस, मंथन आणि अक्षरगंध या परीक्षांच्या तयारीसाठी शाळेतील १२ मुलं त्यांनी तब्बल तीन महिने स्वत:च्या घरी मुक्कामी नेऊन त्यांचा अभ्यास घेतला.

क्रमिक अभ्यासाबरोबरच भारती यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने त्यांना चित्रपटासह चित्रीकरण बघायलाही नेलं. कोविड काळात ‘डोनेट युअर स्मार्ट फोन’ हा उपक्रम सर्वांत पहिला त्यांनी राबविला. लॉकडाऊन काळात सर्वाधिक दीड हजार ऑनलाईन तासिका पूर्ण करणाऱ्या त्या एकमेव आहेत. दरावस्ती शाळेत सध्या २४ पटसंख्या आहेत. यातील काही मुलांनी खासगी शाळांतून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आहे. जयंती, पुण्यतिथी यासह शनिवारीही पूर्ण दिवस शाळा ठेवून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला. स्पर्धा परीक्षांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोवाडा, लोकनृत्य आणि बालनाट्यही शिकवले. यातही त्यांच्या विद्यार्थ्यांनी अव्वलस्थान पटकावून भारती ओंबासे यांच्या कष्टाचे चीज केले.

चौकट :

विद्यार्थी दिसेल तिथे वर्ग सुरू

शाळेत मुलांचं येणं कमी असल्याचं पाहिल्यानंतर भारती ओंबासे यांनी विद्यार्थी दिसेल तिथे शाळा भरविण्याचा उपक्रम हाती घेतला. घरात काम करणारी विद्यार्थिनी असो वा पाळीव जनावरांच्या मागे रानात असलेला विद्यार्थी दिसो भारती बाई स्वानुभवातून शिक्षण देण्यासाठी सज्ज होत्या. नेहमीच्या आयुष्यात उपयोगाला येणाऱ्या गोष्टींची संपूर्ण माहिती मिळाल्याने विद्यार्थीही हरकुन जात होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली.

कोट :

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे आव्हान पेलल्यानंतर त्यांना उत्तम पद्धतीने घडविण्याचे मी ठरवलं. पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांनी दिलेली साथ या दोन्हीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेसह सांस्कृतिक कार्यक्रमातही मुलं चमकली. वाड्या वस्त्यांवरील हे टॅलेंट सर्वांसमोर आल्यानंतर मलाही त्याचा आनंद झाला.

- भारती ओंबासे, दरावस्ती (टाकेवाडी) ता. माण

फोटो

०२सातारा-एज्युकेशन०१

माण तालुक्यातील दरावस्ती येथील भारती ओंबासे या मुलांना खेळ रूपाने शिकवत असतात.