शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विद्यार्थ्यांनी वाचविले दोन लाख : भुर्इंज येथे आधुनिक गुरुदक्षिणेचा नवा आदर्श; कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय झाले चकाचक

By admin | Updated: March 18, 2015 00:06 IST

रंगकाम करणाऱ्या कारागीरांप्रमाणे करुन सुमारे २ लाख रुपये वाचविले आहेत. या कृतीतून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची कलाही अवगत झाली असून खऱ्या अर्थाने त्यांनी जीवन शिक्षण येथे प्राप्त केले

भुर्इंज : रयत शिक्षण संस्थेच्या भुर्इंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाखमोलाची अनोखी कामगिरी बजावत शाळामाउलीच्या सेवेत कर्तव्याचे रंग भरले आहेत. नवीन इमारतीतील तब्बल २७ खोल्यांचे रंगकाम सराईत रंगकाम करणाऱ्या कारागीरांप्रमाणे करुन सुमारे २ लाख रुपये वाचविले आहेत. या कृतीतून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची कलाही अवगत झाली असून खऱ्या अर्थाने त्यांनी जीवन शिक्षण येथे प्राप्त केले आहे.अनोख्या उपक्रमांचे रोल मॉडेल म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांनी केलेली ही लाखमोलाची कामगिरी या वाटचालीतील पुढचे पाऊल ठरले आहे. प्रार्थनेच्यावेळी प्राचार्य पाटील यांनी इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांना या कामासाठी आवाहन केले.दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले नाही. जे विद्यार्थी स्वत:हून तयार झाले त्या विद्यार्थ्यांचे ६ ते ७ जणांचे गट तयार करण्यात आले. ५ हजार रुपये खर्च करुन रंगकाम करण्यासाठीचे साहित्य आणण्यात आले. कलाशिक्षक राऊत व वालेकर यांनी रंगकामाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रथम शाळेच्या भिंती धुवून काढल्या. त्यानंतर घासून त्यात पुट्टी भरून भिंती आॅईलनबाँड कलरने रंगविण्यात आल्या. सरासरी दोन दिवसात एक वर्ग रंगवून झाला. वर्गखोल्यांसोबत व्हरांडा, जीने, पायऱ्या याचेही आकर्षक रंगकाम विद्यार्थ्यांनीच केले. प्रत्येक खोलीला वेगळा रंग देण्यात आला आहे. कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी केलेले काम पाहिल्यानंतर त्याचा दर्जा इतका उच्च आहे की, हे एवढे मोठे काम चिमुकल्या हातांनी साकारले आहे, यावर विश्वास बसणे अवघड जाते. (वार्ताहर)श्रमाला कलेची जोडदेणगीदारांच्या मदतीतून नवीन शाळेची इमारत उभी राहिली; मात्र या इमारतीतील २७ खोल्यांचे रंगकाम करण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यामुळे प्राचार्य आर. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन हे काम करण्याची कल्पना कलाशिक्षक एस. पी. राऊत आणि टी. डी. वालेकर यांच्यासमोर मांडली. राऊत आणि वालेकर यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शिक्षकांच्या कलेला विद्यार्थ्यांच्या श्रमाची जोड मिळाली अन् शाळेचे रूप बदलून गेले.उत्स्फूर्त प्रतिसाद सुरुवातीला जेव्हा आम्ही या कल्पनेचा विचार केला तेव्हा त्याला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत शंका होती. पण विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे प्रत्येक खोलीतील रंगाची शेड वेगळी आहे. स्वत:च रंगकाम केल्याने भिंती खराब होऊ नयेत याचे नैतिक भान आणि जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या कामात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रंगकामाबाबत कोणतीही माहिती विचारा ते धडाधड एखाद्या सराईत कारागीराप्रमाणे माहिती देतील. - आर. एस. पाटील, प्राचार्य विद्यार्थ्यांचा सन्मान करणारभुर्इंज येथील या विद्यालयाने विद्यार्थी घडवलेच याशिवाय त्यांना योग्य वातावरण मिळावे, यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नातून हे शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे. या उभारणीत २७ खोल्या व परिसराचे रंगकाम विद्यार्थ्यांनी करुन सुमारे दोन लाख रुपये वाचविले आहेत. या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. - भैय्यासाहेब जाधवराव, सदस्य, रयत शिक्षण संस्था