शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:02 IST

भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही.

ठळक मुद्देसुदृढ लोकशाहीसाठी उदयनराजेंसारखे नेते विरोधी पक्षात हवेत : राजू शेट्टी साताऱ्यात मनधरणीचा प्रयत्न; कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे उदयनराजेंकडून स्पष्टीकरण

सातारा : सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना सध्याच्या घडीला कोणी वालीच ठेवायचा नाही, असा प्रकार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखे नेते विरोधी पक्षात टिकून राहायला हवेत, तरच लोकशाही सुदृढ राहील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांनी कमराबंद चर्चा केली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी हे मत व्यक्त केले. मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो, याचे उदयनराजेंना खूप वाईट वाटले. मला भेटून विविध विषयांवर चर्चा करायचीय, असे मतही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.

आजच्या भेटीत संसदेतील अनुभव एकमेकांशी शेअर केले. काही दिवसांपासून उदयनराजेंविषयीच्या भाजप प्रवेशाबाबत उलट-सुलट बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर मी उदयनराजेंशी चर्चा केली. भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही. उदयनराजेंची विरोधी पक्षाला गरज आहे.शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत ताकतीने मांडावेत. कुठलाही निर्णय घेताना जनसामान्यांचा विचार करावा, अशी विनंती उदयनराजेंकडे केली. त्यावर मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे उदयनराजेंनी सांगितले.ऊस नको भात लावा, असा सल्ला केंद्रातील मंत्री, अधिकारी शेतकऱ्यांना देताना काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले, याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, मला फ्रान्सच्या राणीने बोललेले वाक्य यानिमित्ताने आठवते. ब्रेड मिळत नसेल तर केक खा, असाच अनाहूत सल्ला ही मंडळी आपले अपयश झाकण्यासाठी देत आहेत.

 दरम्यान, विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी पक्ष किती जागा लढविणार आहे? या प्रश्नाबाबत बोलताना किती जागा शिल्लक राहतात, ते बघून निर्णय घेतो, असेही शेट्टी म्हणाले. साखर कारखानदारच भाजपमध्ये जाऊन बसले आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी दिलीय ते आमच्यासोबत आहेत. तसेच ज्या भागातील शेतकऱ्यांची संघटनेला साथ मिळते, त्या ठिकाणच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली आहे, असंही शेट्टी यांनी सांगितले.दरम्यान, या भेटीनंतर उदयनराजेंनी कुठलेही मत व्यक्त करण्यास स्पष्ट नकार दिला.उदयनराजेंसोबत झालेल्या चर्चेप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य संघटक अर्जुनराव साळुंखे, प्रवक्ते अनिल पवार, सुनील काटकर आदी उपस्थित होते.सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे तर भाजपचे कार्यकर्तेसीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स या केंद्रातील संस्था याच भाजपच्या कार्यकर्त्या बनल्या आहेत. त्याचा वापर करून विरोध करणाऱ्यांना पिडा देण्याचे काम सुरू आहे. या संस्थांना सर्वसामान्यांचा आक्रोश दिसत नाही. सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करताना जो आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, तो या संस्थांना का दिसत नाही?

बबनराव पाचपुते, दिलीप सोपल, तानाची सावंत, दिलीप गावित, सुभाष देशमुख या नेत्यांनी गैरव्यवहार केलेले भाजपप्रणित या संस्थांना चालते; मात्र भाजपला विरोध करणाऱ्यांच्या मागे या संस्था हात धुवून मागे लागत आहेत, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRaju Shettyराजू शेट्टीSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण