शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील महिला पर्यटकांची नवजा धबधबा परिसरात छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:21 IST

पाटण तालुक्यातील कोयनानगरपासून काही अंतरावर असणाऱ्या नवजा येथील धबधबा परिसरात साताºयातील महिला पर्यटकांची तळीरामांनी छेडछाड केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसाताऱ्यातील महिला पर्यटकांची नवजा धबधबा परिसरात छेडछाड महिलांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना राबवण्याची मागणी

सातारा : पाटण तालुक्यातील कोयनानगरपासून काही अंतरावर असणाऱ्या नवजा येथील धबधबा परिसरात साताऱ्यातील महिला पर्यटकांची तळीरामांनी छेडछाड केल्याची घटना घडली.कोयनानगरपासून ८ ते १० किलोमीटर अंतरावर नवजा हे गाव आहे. याठिकाणी पावसाळ्यामध्ये पडणारा धबधबा पाहण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. रविवार, दि. १५ रोजी सातारा येथील २३ जणांचा एक ग्रुप चार वेगवेगळ्या वाहनातून सकाळी १० वाजता सातारा येथून नवजाकडे रवाना झाला.

तारळे, जळवमार्गे निसर्गाचा आनंद लुटत हा ग्रुप दुपारी १ वाजता नवजा येथे पोहोचला. वाहने पार्किंग करून धबधब्याच्या दिशेने चालत जात असताना रस्त्यावर ठिकठिकाणी तळीराम युवक दारू ढोसत रस्त्यावर उभे होते. काहीजण समूहाने दुचाकी वेगाने चालवत हॉर्न वाजवत जात होते. विशेष म्हणजे या परिसरात एकही पोलीस कर्मचारी तैनात नव्हता.

साताऱ्यांतील पर्यटक धबधब्याच्या दिशेने चालत जात असताना ग्रुपमधील महिलांना तळीराम युवकांनी धक्के मारने, जोरजोराने ओरडणे, पाठीमागून वेगाने पळत येत महिलांना भीती दाखवणे, मध्येच रस्त्यात येऊन उभे राहणे, असे प्रकार सुरू केले. त्यावर ग्रुपमधील युवकांनी संबंधित युवकांना जाब विचारल्यानंतर त्यांचे ओरडने थोडेफार कमी झाले.साताऱ्यातील महिला पर्यटक नवजा येथील प्रेक्षक गॅलरीत पोहोचल्या असता त्याठिकाणीही तळीराम युवकांनी त्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. धबधबा पाहून पुन्हा खाली येताना तळीराम युवकांच्या मनस्तापाला त्यांना सामोरे जावे लागले.पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे तळीराम युवकांचे फावत असून महिलांची छेड काढण्याइतपत त्यांची मजल जात आहे.

रविवारी नवजा येथे आलेल्या या भयानक अनुभवाने साताऱ्यांतील महिला पर्यटकांनी पुन्हा नवजा येथे कधीही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसंबंधी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही महिलांनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर