शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

डोंगरी मावळ्यांच्या ‘पावसाळी लढाई’ला बळ

By admin | Updated: June 16, 2015 01:21 IST

कांदाटी खोऱ्यात उपक्रम : संपर्क तुटण्यापूर्वीच पोहोचली औषधे; मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज संघटनेचे साह्य--वन-जन जोडो अभियान...

राजीव मुळ्ये ल्ल सातारा  -पावसाळ्यात किमान दोन-अडीच महिने ज्यांचा जगाशी संपर्क तुटतो, त्या डोंगरी मावळ्यांच्या एकाकी लढाईला यावर्षी ‘वन-जन जोडो’ अभियानाचे भक्कम पाठबळ लाभले. कांदाटी खोऱ्यातील प्रमुख पाच आणि एकूण तेरा गावांमध्ये पावसाळ्यात पुरेल एवढा औषधसाठा पाऊस सुरू होण्यापूर्वीच पोहोच झाला. महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनच्या सातारा युनिटने कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली. खडतर आणि कष्टप्रद जीवन असणाऱ्या दुर्गम कांदाटी खोऱ्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थानिकांचा जीवनसंघर्ष सुरू असतो. डोंगरात वाहनेच चालत नसल्यामुळे अवजड वस्तूही खांद्यावरूनच उचलून न्याव्या लागतात. अपार कष्ट केल्यामुळे या मंडळींना प्रामुख्याने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. मणक्यांचे विविध आजार होऊन मान, पाठ, कमरेच्या वेदना सुरू होतात. पावसाळ्यात हे आजार अधिक प्रमाणात डोके वर काढतात.नेमक्या याच वेळी या डोंगरी माणसांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. म्हाळुंगे, मोरणी, अरव, वलवण, शिंदी या प्रमुख पाच गावांसह १३ गावे एकाकी पडतात. शिवसागर जलाशयातील लाँचसेवा पूर्णत: बंद असते. बससेवा खेडपासून (कोकण) शिंदीपर्यंत आहे. तीही पावसाळ्यात बेभरवशाची असते. अतिपाऊस, दरड कोसळणे या कारणांनी बसही अनेकदा येत नाही. अशा वेळी आजार झाल्यास रुग्णाचे अतोनात हाल होतात. जीवरक्षक प्रणाली आसपास कुठेच उपलब्ध नाही.वन्यजीव विभाग आणि ‘ड्रोंगो’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे या भागात सप्टेंबर २०१४ पासून ‘वन-जन जोडो’ अभियान सुरू आहे. या मोहिमेद्वारे स्थानिकांना केवळ पर्यायी उत्पन्नस्रोत आणि पायाभूत सुविधा पुरविणे एवढेच उद्दिष्ट न मानता एकंदर कल्याण डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांना औषधे घरपोच करण्यात आली. थंडीताप आणि सर्वसाधारण आजारांबरोबरच सांधे, मणके आणि पाठीच्या आजारांवरील औषधे या भागात अधिक प्रमाणात देण्यात आली आहेत. अ‍ॅलोपथी आणि आयुर्वेदिक औषधेही या मोहिमेत देण्यात आली. ग्रामस्थांना औषधांची व्यक्तिगत पाकिटे देण्यात आली असून, कोणते औषध कोणत्या आजारावर, कसे, किती आणि कधी घ्यायचे, याबाबत सूचना प्रत्येक पाकिटासह देण्यात आल्या आहेत. विभागीय वनअधिकारी एम. एम. पंडितराव, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुनील भोईटे, डॉ. अश्विनी माळकर यांच्यासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. स्थानिक रोपांना ‘ब्रँड व्हॅल्यू’‘वन-जन जोडो’ अभियानांतर्गत या खोऱ्यात प्रायोगिक तत्त्वावर रोपवाटिका सुरू करण्यास प्रारंभ झाला आहे. स्थानिक अधिवासात वाढू शकतील, अशी दुर्मिळ रोपे तयार करून त्यांना ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या दÞृष्टीने ग्रामस्थांना रोपांची यादी देण्यात आली होती. स्थानिकांनी या झाडांच्या बिया गोळा केल्या असून, यंदाच्या पावसाळ्यात त्या गादीवाफ्यावर पेरण्यात येतील. उगवण झाली की रोपे पिशवीत कशी भरायची याचे प्रशिक्षण ‘ड्रोंगो’ने स्थानिकांना दिले आहे. भविष्यकाळात गावठी आंब्याचे उत्कृष्ट वाण, कापा फणस , मोठे जांभूळ, पांढरा पळस, कदंब, गारदर वेल, बकुळ अशी रोपे या वाटिकेत तयार होतील आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल.