शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत ९६ टीएमसीवर साठा, ९१ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:57 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठा झाला असून टक्केवारी ९१.७० आहे.

ठळक मुद्देकोयनेत ९६ टीएमसीवर साठा, ९१ टक्के पाणीअत्यल्प पाऊस; नवजा अन् महाबळेश्वरला २७ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठा झाला असून टक्केवारी ९१.७० आहे.सातारा शहरासह पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपूर्वी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला कोयनानगर, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस कोसळला. तसेच धरण क्षेत्राही पावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.सध्यस्थितीत कमी अधिक फरकाने धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. त्यातच सध्या पावसाचा जोर एकदम कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे कोयनेचे दरवाजे बंद आहेत.

फक्त पायथा वीजगृहातूनच २०५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळच्या सुमारास धरणातील साठा ९६.४३ टीएमसी ऐवढा झाला होता. धरण भरण्यास अजून जवळपास नऊ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ आणि यावर्षी आतापर्यंत ४०२७ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजाला सकाळपर्यंत २७ व जूनपासून आतापर्यंत ४५९४ आणि महाबळेश्वरला २७ व यावर्षी आतापर्यंत ४४४७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.सातारा शहरात उघडीप...सातारा शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी ऊन पडले. तर पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसरRainपाऊस