शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

गोंदवलेत वीज वाहक तारांनी घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:53 IST

म्हसवड : गोंदवले बुद्रुक येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असतानाच अवघ्या काही फुटांवर वीज वाहक ...

म्हसवड : गोंदवले बुद्रुक येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असतानाच अवघ्या काही फुटांवर वीज वाहक तारेने अचानक पेट घेतला. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काही काळ सर्वांचीच घबराट उडाली. दरम्यान, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. महामार्ग ठेकेदार व वीज कंपनीच्या अडमुठेपणामुळे जीवितास धोका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गोंदवले बुद्रुक येथे मोहोळ-सातारा महामार्गाचे काम सुरू आहे. या कामांतर्गत रस्त्यालगत नव्याने विजेचे खांब व तारा टाकण्यात आल्या आहेत. परंतु हे काम महामार्ग ठेकेदार व वीज कंपनीने मनमानीपणे केले आहे. येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराला लागून असलेल्या संरक्षक भिंतीला लागून उभारण्यात आलेल्या खांबांवर हलक्या प्रतीच्या विजेच्या तारा टाकण्यात आल्या आहेत. या ठिकाणी भाविकांची संख्या मोठी व नागरिकांची वर्दळ मोठ्याप्रमाणावर असल्याने चांगल्या प्रतीच्या तारा टाकण्यात याव्यात, असा आग्रह ग्रामस्थांनी केला होता. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

मंगळवारी संध्याकाळी सातच्यासुमारास समाधी मंदिरात भाविक रांगेतून दर्शन घेत होते. मंदिरापासून अगदी काही फुटांवर असलेल्या संरक्षण भिंतीवरून गेलेल्या वीजवाहक तारेने अचानक पेट घेतला.

शॉर्टसर्किटमुळे झालेल्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरील लोकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. काही फुटांवर आगीचे लोट पडू लागल्याने भाविकही घाबरून पळाले. दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष घटनास्थळी पोहोचले. बारदानच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. वीजप्रवाह सुरू असल्याने आगीने अधिकच पेट घेतल्याने ते जखमी झाले. काही नागरिकांनी विद्युत जनित्रच्या फ्यूज काढल्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत सुमारे सातशे ते आठशे फुटांपर्यंतच्या वीज वाहक तारा जळून खाक झाल्या. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती, तर लोकवस्तीत आग पसरण्याची भीती होती. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची कल्पना देऊनही संबंधित यंत्रणा घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. तब्बल अठरा तासांनंतर संबंधित ठेकेदार व वीज कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

चौकट :

महामार्ग ठेकेदार व वीज वितरण कंपनीच्या संगनमताने निकृष्ट वीज वाहक तारा टाकल्यानेच मंदिर परिसरात आग लागण्याची घटना घडली आहे. जीवितहानी झाल्यावर संबंधित विभागाला जाग येणार आहे का? असा प्रश्न मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केला आहे.