शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीस गेलेली कार इंदोरमध्ये सापडली-- अवघ्या चोवीस तासांत एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:14 IST

कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन नवी कार चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अवघ्या चोवीस तासांतच कारसह पकडण्यास बोरगाव पोलिसांच्या टीमला

ठळक मुद्दे गुंगीचे औषध देऊन पळवली होती कार

नागठाणे : कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन नवी कार चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अवघ्या चोवीस तासांतच कारसह पकडण्यास बोरगाव पोलिसांच्या टीमला यश आले.

मनिषकुमार बदनसिंग मलीक (वय २४ वर्षे, रा. जाकोली, ता. जि. काथन, राज्य हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गावातील दोन साथीदारांच्या मदतीने कारची चोरी केल्याचे कबुली दिली. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कंटेनर चालक राजेश चौहान (वय ३८, रा. जैतवार सोना, सुजनीपूर, जि. गांजीपूर उत्तरप्रदेश) हा फलटणहून सांगलीकडे कंटेनरमधून नवीन कार घेऊन जात होता. बुधवार, दि. २९ रोजी रात्री आदर्की फाटा येथील हॉटेलवर चौहान जेवण करण्यासाठी थांबला होता. त्यावेळी तेथे अन्य तिघेजण आले. त्यांनी दारूमधून चौहान यांना गुंगीचे औषध दिले. जेवण झाल्यानंतर चौहान हा कंटेनर घेऊन आदर्कीहून वाढे फाट्यामार्गे सांगलीकडे निघाला. बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत पोहोचल्यानंतर चौहान याला झोप अनावर झाली. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्याकडेला उभा करून तो कंटेनरमध्येच झोपी गेला. सकाळी दहा वाजता त्याला जाग आल्यानंतर कंटेनरमध्ये आठ लाखांची नवी कोरी कार नसल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने बोरगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

बोरगाव पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन मोबाईल लोकेशनवरून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित आरोपी इंदोर, मध्यप्रदेश येथे असल्याचे समजले. त्यानुसार तेथील पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. इंदोर पोलिसांनीही वेळ न दवडता बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी मनिषकुमारच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला अवघ्या चोवीस तासांत अटक करून इंदोर पोलीस आरोपीसह बोरगाव पोलीस ठाण्यात आले. आरोपीला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ते इंदोरला निघून गेले.या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, प्रकाश राठोड, चंद्रकांत कुंभार, चेतन बगाडे, स्वप्नील माने आदींनी भाग घेतला.चोरीची कार इंदोर पोलिसांनी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस